For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kagal Crime | शिवनेरी पार्कमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; ११ लाखांचे सोने लंपास

02:32 PM Apr 16, 2026 IST | NEETA POTDAR
kagal crime   शिवनेरी पार्कमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ   ११ लाखांचे सोने लंपास
Advertisement

                                         कागलमध्ये भरदिवसा घरफोडी

Advertisement

कागल -शहरातील शिवनेरी पार्क, अनंत रोटो परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोकड व सोन्याचे दागिने असा सुमारे २१ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. रफिक गौस सय्यद यांच्या घरी ही चोरी झाली असून या प्रकरणी कागल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भर दिवसा झालेल्या या चोरीमुळे परिसरात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रफिक गौस सय्यद हे होलसेल औषध विक्रेते असून त्यांचे अनंत रोटो येथे निवासस्थान आहे. मंगळवारी नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजता मुलासह ते कोल्हापूर येथील कार्यालयात गेले होते. त्यांच्या पत्नीची तब्येत ठीक नसल्याने त्यांनाही सोबत नेण्यात आले होते. त्यामुळे घराला कुलूप होते. सायंकाळी दहा वाजता घरी परतल्यानंतर घराच्या गेटचे व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले आढळून आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

Advertisement

चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व बेडरूममधील तिजोरीचे लॉक तोडून त्यातील रोकड व दागिने चोरून नेले. चोरी गेलेल्या मालामध्ये १० लाख रुपये रोख रक्कम तसेच सुमारे ११ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने यांचा समावेश आहे. यात सोन्याचे नेकलेस (अंदाजे ३० ग्रॅम) किंमत सुमारे ३ लाख रुपये, सोन्याचा राणीहार (३० ग्रॅम) किंमत सुमारे ३ लाख रुपये,सोन्याची साखळी (१५ ग्रॅम) किंमत सुमारे दीड लाख रुपये, चार सोन्याच्या अंगठ्या (एकूण २० ग्रॅम) किंमत सुमारे २ लाख रुपये, तसेच सोन्याचे गंठण (१५ ग्रॅम) किंमत सुमारे दीड लाख रुपये असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच श्वान पथक व फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात येत आहे. करवीर विभागाचे पोलीस उपाधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांनी मंगळवारी रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली. यावेळी पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे व पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.