For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | कोल्हापुरात भरवस्तीत 4 घरे फोडली! 11तोळे सोनं आणि रोखड लंपास; करवीर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

11:02 AM Jun 16, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   कोल्हापुरात भरवस्तीत 4 घरे फोडली  11तोळे सोनं आणि रोखड लंपास  करवीर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ
Advertisement

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली इथल्या सरदार गल्लीत चोरट्यांनी ४ घर फोडून, दोन कुटुंबातील ११ तोळे सोन्याचे दागिन्यासह रोख रकमेची चोरी झाली. तर दोन ठिकाणी चोरट्यांनी केलेला चोरीचा प्रयत्न फसला. सोमवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेची फिर्याद हरी बसंत जिरगे. बय ४२, रा सरदार गल्ली प्रयाग चिखली ता. करवीर यांनी करवीर पोलिसात दिली आहे.

Advertisement

प्रयाग चिखली इथल्या सरदार गल्लीत सोमवारी मध्यरात्री चोरट्यानी चार घर फोडली. या घरांची कुलपं तोडून चोरटयांनी हरी जिरगे, लक्ष्मण लोहार यांच्या घरातील ऐवज लुटला. हरी जिरगे हे कुटुंबासह तुळजापूर इथं देव दर्शनासाठी गेले होते. त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील तिजोरी फोडून दागिने चोरट्यांनी लंपास केले. जिरगे यांच्या समोरील लक्ष्मण बाळासाहेब लोहार हे देखील चिखलीतील घराला कुलूप लावून सुट्टी निमित्त कुटुंबियांसहित फुलेवाडी इथल्या घरात राहायला गेले होते. त्यांच्याही घरातील तिजोरी फोडून चोरट्यांनी लहान मुलांचे दागिने आणि बीस हजाराची रोकड असा एक लाखाचा किंमती ऐवज चोरून नेला. यासह प्रयाग रोडवरील कासाराचं दुकान आणि एका ब्युटी पार्लरमध्ये देखील त्यांनी चोरी केली.

मात्र त्यांच्या हाती किरकोळ रक्कम लागली. भरवस्तीत चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी या घरांच्या आजूबाजूच्या सहा घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या. चोरट्यांनी या गावातील आणि परिसराची रेकी केल्याचा संशय आहे. चोरीच्या घटनेनंतर चार चाकीतून हे चोरटे शिंगणापूर बंधाऱ्यावरून पळून गेल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Advertisement

याबाबत हरी जिरगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण किमंत, १ तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस, १ तोळे वजनाचे सोन्याचे चेन मंगळसुत्र, १ तोळे वजनाचे सोन्याच्या कानातील रिंगा व झुमके ४ नग, ५ ग्रॅम वजनाचे कानातील फुले व साखळ्या ४ जोड, १० ग्रॅम वजनाच्या रिंगा व मुद्या, ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील वेल ३ ग्रॅम वजनाच्या ७ अंगठ्या, ४५० ग्रॅम वजनाचे ९० हजाराचे चांदीचे दागिने लंपास केले. चोरट्यांनी घराचा पुढील दरवाजाचा कडी कोयडा उचकटुन घरात आत प्रवेश केला. घरातील बरील बाजूस असलल्यो रूममधील लॉखडी कपाटातील कप्यातील दागिने चोरून नेले. तपास सपोनि शेख हे करत आहेत.

Advertisement
Tags :

.