For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pandharpur News | पंढरपूर परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट

02:55 PM Jun 05, 2026 IST | NEETA POTDAR
pandharpur news   पंढरपूर परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट
Advertisement
भाविकांच्या अंगावरील दागिने व नागरिकांचे घर फोडून चोऱ्या
पंढरपूर : पंढरपूर शहर व उपनगरांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे भाविकांच्या अंगावरील दागिने व नागरिकांचे घर फोडून चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे भाविक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
उन्हाळी सुट्टी असल्यामुळे रुक्मिणी नगर येथील रहिवासी राजीव कुलकर्णी हे घराला कुलूप लावून परगावी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी १ जून रोजी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील रोख १० हजार रुपये व १० हजार रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू असा सुमारे २० हजारांचा मुद्देमाल लांपस केला.
कुलकर्णी परगावाहून आल्यानंतर ही घटना घडली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात आणण्यात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गोसावी तपास करत आहेत. अधिक महिना असल्यामुळे पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे.
यामुळे बसस्थानक, चंद्रभागा वाळवंट, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, दर्शन रांग आदी ठिकाणी भाविकांची गर्दी होत आहे. गर्दीचा फायदा घेऊन चोरटे महिलांच्या पर्समधील व अंगावरील दागिने लांपस करण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे भाविकांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी पोलिसांनी करडी नजर ठेवून चोरट्यांनी जेरबंद करावे, अशी मागणी होऊ लागली आहे.
Advertisement

Advertisement
Tags :

.

© Copyright, All Rights Reserved.