For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News | सांगलीच्या शंभर फुटी रस्त्यावर चोरट्यांचा धुमाकूळ; मिठाई दुकानातून ५.५० लाख लंपास

02:51 PM Sep 02, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   सांगलीच्या शंभर फुटी रस्त्यावर चोरट्यांचा धुमाकूळ  मिठाई दुकानातून ५ ५० लाख लंपास
Advertisement

Advertisement

सांगली : शहरातील शंभर फुटी रस्त्यावर चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एका मिठाईच्या दुकानाचे शटर फोडून कॅश काऊंटरमधील तब्बल ५ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या चोरीने परिसरात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे, चोरीचा संपूर्ण थरारक प्रकार दुकानातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याआधारे विश्रामबाग पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.याप्रकरणी योगेश सुरेश चव्हाण (रा. कृष्णाई बंगला, माने चौक,शंभर फुटी रस्ता, चेतना पेट्रोल पंपाजवळ, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement

फिर्यादी योगेश चव्हाण यांचे शंभर फुटी रस्त्यावर मिठाईचे दुकान आहे. दुकानाच्या सुरक्षेसाठी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, चोरट्यांनी पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत दुकानाला लक्ष्य केले. सोमवारी पहाटे सुमारे एक वाजण्याच्या सुमारास तीन चोरटे दुकानाजवळ आले. त्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यातील दोघांनी थेट कॅश काऊंटरकडे धाव घेतली. कॅश काऊंटरचेही कुलूप तोडून त्यातील ५ लाख ५० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. चोरीचा हा संपूर्ण प्रकार अवघ्या २० मिनिटांत उरकण्यात आला. दुकानातील रोकड हाती लागताच तिन्ही चोरटे तेथून पसार झाले. विशेष म्हणजे, चोरट्यांच्या हालचाली आणि चोरीची संपूर्ण घटना दुकानातील सीसीटिव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झाली आहे.

सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. शटरचे कुलूप तुटलेले आणि दुकानातील कॅश काऊंटरची अवस्था पाहून दुकान मालकाच्या पायाखालची जमीनच सरकली. तातडीने याची माहिती विश्रामबाग
पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनीघटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला.

सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्यामधील चोरट्यांच्या हालचालींची तपासणी सुरू करण्यात आली आहे.विश्रामबाग पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. एवढी मोठी रोकड दुकानात ठेवली असताना चोरट्यांनी नेमका कसा डाव साधला, चोरीपूर्वी दुकानाची पाहणी केली होती का, तसेच या टोळीचा यापूर्वीच्या चोरीच्या घटनांशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत.

Advertisement
Tags :

.