Kolhapur News : शिरोली एमआयडीसीत दोन दिवसांत साडेसहा लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास
औद्योगिक वसाहतीत दोन दिवसांत धाडसी चोरी
पुलाची शिरोली : शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सुमारे साडेसहा लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. यामध्ये शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित कंपनीतील दोन सुरक्षा रक्षक व एका सफाई कामगाराचा समावेश आहे. सलग दोन दिवस चोरट्यांनी शिरोली एमआयडीसी व पंचगंगा नदी काठावरील व गावातील विहिरींना टार्गेट करत धुमाकूळ घातला आहे.
दोन दिवसांत घडलेल्या घटनेवरून चोरट्यांनी शिरोली पोलिसांना आव्हान दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरोली औद्योगिक वसाहतीत पुणे-बंगळूर महामार्गालगत एका कंपनीत दोषा सुरक्षा रक्षक व एका सफाई कामगाराने संगनमताने सव्वाचार लाखांच्या पितळी पाईप आणि लोखंडी स्क्रॅपची चोरी केली. त्यांच्यावरशिरोली पोलीस ठाण्यात कंपनीच्या वतीने गुन्हा दाखल केला आहे. सुरक्षा रश्नक सतीश नामदेव खाडे व युवराज गणपती नाईक व सफाई कामगार प्रशांत बाळासाहेब टिपगुडे अशी त्यांची नावे आहेत.
तिघांनी २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी या काळात कंपनीतून पितळी पाईप ३,७२,००० रुपये किमतीचे ४३ नग व स्क्रैप ५१,९६० रुपयांचे साहित्य लंपास केले. याबाबतची फिर्याद कंपनीचे मनुष्यबळ अधिकारी रवींद्र कारंडे यांनी दिली. नदीच्या काठावर असलेल्या उत्तम पद्माई व बचन पद्माई यांच्या पाण्याच्या मोटारी, टोपकर पाटील यांच्या विहिरीवरील वीज केबल्स, पिराच्या दर्याजवळील केबल, उसतोड मजुरांच्या खोपट्यातील सब्बा तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम पंचरा हजार रुपये व मोबाईल संच असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल मंगळवारी चोरट्यांनी लंपास केला आहे.