For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Crime | चंचळी गावात चोरट्यांचा धुमाकूळ

01:09 PM Mar 09, 2026 IST | NEETA POTDAR
satara crime   चंचळी गावात चोरट्यांचा धुमाकूळ
Advertisement

                      कोरेगाव तालुक्यात मध्यरात्री चोरींची मालिका

Advertisement

एकवे -कोरेगाव तालुक्यातील  चंचळी गावात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत बार ते पाच ठिकाणी चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली गावातील घर, पोस्ट ऑफिस, टपरी तसेच दुकान फोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे काही ठिकाणी चोरी करतानाचे प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून चोरट्यांनी दुकान फोडल्यानंतर बरणीतून चिक्की व कुरकुरेचे पाकिटे काढून खात बसल्याचेही स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, यामुळे गावात भीतीचे वातावरण असून कोरेगाव पोलिसांच्या रात्रगरतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चंचळी येथील नारायण शामराव जाधव व त्यांची बहीण सावित्रा पांडुरंग कदम हे गोव्यालगत असलेल्या घरकुलात राहतात. शुक्रवारी मध्यरात्री नारायण जाधवस्वच्छतागृहासाठी उठले असता चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यावेळी सावित्रा कदम यांच्या गळ्यातील सुमारे अडीच तोळ्यांचा सोन्याचा हार चोरट्घाने हिसकावून घेतला. सावित्रा कदम यांनी आरडाओरड केल्यावर ८७ वर्षीय नारायण जाधव यांनी चोराला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्याने त्यांच्या छातीत जोरात बुक्की मारून त्यांना खाली पाहले व पसार झाला.

याचदरम्यान गावातील ग्रामपंचायतसमोर असलेल्या पोस्ट ऑफिसचे कुलूप तोडण्यात आले. अनिल शिंदे यांच घर फोडून घरातील पेटी चोरट्यांनी लंपास केली. संपत कुंभार यांची टपरीही फोडण्यात आली. एकाच रात्री गावात पाच ते सहा ठिकाणी चोरीचे प्रकार घडल्याने चंचळी गावात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे चंचळी गाव हे कोरेगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख हवालदार नागराज कदम यांचे नाव असतानाही चोरट्यांनी बेधडकपणेहात साफ करत पोलिसांनाच उघड आव्हान दिल्याची चर्चा गावात रंगली आहे. त्यामुळे कोरेगाव पोलिसांची रात्रगस्त डी केवळ कागदोपत्रीच सुरू असल्याथा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच कोरेगाव पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंतकुमार काटकर, उपनिरीक्षक अतुल जगदाळे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने चंचळी येथे भेट देऊन पाहणी केली. मात्र एकाच रात्री अनेक ठिकाणी चोरीचे प्रकार घडूनही अद्याप एकाडी नागरिकाने अधिकृत तक्रार दाखल करण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही, ही बाबही आश्चर्यकारक मानली जात आहे. दरम्यान, गावात वारंवार होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोरेगाव पोलिसांनी तातडीने गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.