For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडीत महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावून चोरट्यांचे पलायन

11:07 AM Jun 10, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडीत महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावून चोरट्यांचे पलायन
Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडी शहरात भर वस्तीत कॉसमॉस बिल्डींगच्या परिसरात ठाकूर नामक महिलेच्या गळ्यातील चैन मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात चोरटयांनी हिसकावून पलायन केले. ही घटना आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली .सदरचे दोन तरुण त्यांच्या पेहरावावरून बिहारी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते कैद झाले आहेत . घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून पंचनामाही केला आहे. या भागाच्या नगरसेविका नीलम नाईक यांनी पोलिसांना या संदर्भात कल्पना दिली. भरवस्तीत घडलेल्या चोरीच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.