विलवडेत चोरटयांनी तीन दुकाने फोडली
चोरट्यांचा अपेक्षाभंग ; किरकोळ रक्कम हाती
ओटवणे प्रतिनिधी
बांदा - दाणोली या जिल्हा मार्गावरील विलवडे भरवस्तीतील दोन दुकानांसह सलून अज्ञात चोरट्यांनी फोडली. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत या दुकानात किरकोळ रक्कम असल्यामुळे चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. मात्र अवघ्या दिड महिन्यात दुसऱ्यांदा भरवस्तीत हा धाडसी चोरीचा प्रकार घडल्यामुळे विलवडे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.वडाकडील दोन भुसारी दुकाने आणि सलून मध्यरात्री चोरट्याने फोडून ऐवज लंपास केला यामधून चोरट्याच्या हाती किती मुद्दे माल लागला हे पोलीस तपासात सिद्ध होणार असून पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केल्यानंतर हे स्पष्ट होणार आहे ही तिन्ही दुकाने भर वस्तीत असूनही चोरट्याने शीताफिने चोरी केली असल्याने आणि हे प्रकार वारंवार घडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती सरपंच प्रकाश दळवी यांनी बांदा पोलीस स्थानकात देताच पोलीस कॉन्स्टेबल आर. बी. तेली तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. विलवडे गावात बांदा - दाणोली या जिल्हा मार्गाला लागूनच विलवडे येथील परशुराम बापू दळवी आणि कोनशी येथील दीपक शांताराम नाईक यांचे भुशारी दुकान आहे. तर तांबोळी येथील अभिजीत कदम यांचे हेअर कटींग सलून आहे. अज्ञात चोरट्यानी गुरुवारी मध्यरात्रीनंतर ही तिन्ही दुकाने फोडल्याचे निष्पन्न झाले. मात्र हे तिन्ही दुकाने फोडूनही फक्त ५०० च्या सुमारास किरकोळ रक्कम चोरट्यांच्या हाती लागली. पोलीस कॉन्स्टेबल आर. बी. तेली यांनी या घटनेचा पंचनामा केला. यावेळी विलवडे सरपंच प्रकाश दळवी, माजी सरपंच बाळकृष्ण दळवी, रावजी दळवी,पोलीस पाटील दीपक नाईक, सामाजिक कार्यकर्ते सोनू दळवी, परेश धर्णे आदी उपस्थित होते.