सावंतवाडी शहरात चोरटयांनी ६ दुकाने फोडली
11:10 AM Apr 05, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी-
Advertisement
कणकवली शहरात चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळाल्यानंतर आता सावंतवाडी शहरात इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील सहा दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.चोरट्यांनी एकूण सहा दुकानांना लक्ष्य केले असून एका दुकानातील रोख दोन हजार रुपये तर दुसऱ्या दुकानात पाच हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे. तर अन्य चार दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न झाला असून चोरट्यांचा त्या चार दुकानातील चोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी टीमसह घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आता चोरट्यांचा शोध घेत आहेत. भर बाजारपेठेत झालेल्या चोरीमुळे सावंतवाडी शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Advertisement
Advertisement