For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

JotibaYatra | जोतिबा चैत्र यात्रेत चोरट्यांचा हैदोस; गर्दीचा फायदा घेत २२ तोळे सोन्यावर मारला डल्ला!

03:56 PM Apr 07, 2026 IST | NEETA POTDAR
jotibayatra   जोतिबा चैत्र यात्रेत चोरट्यांचा हैदोस  गर्दीचा फायदा घेत २२ तोळे सोन्यावर मारला डल्ला
Advertisement

                               जोतिबा चैत्र यात्रा मध्ये २२ तोळे सोन्याची चोरी

Advertisement

वारणानगर - वाडी रत्नागिरी ता. पन्हाळा येथील जोतिबा चैत्र यात्रेमध्ये झालेल्या भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी २२ तोळे सोन्यावर डल्ला मारला. यात विविध प्रकारच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. त्यांची किंमत सुमारे २३ लाख ५० हजार रुपये होते. ११ भाविकांना यांचा फटका बसला असून या संदभनि कोडोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हे दाखल होत आहेत.

जोतिबा डोंगर येथे मंगळवारी, बुधवारी चैत्र यात्रेचा भर दिवस असल्याने भाविकांची मोठी गर्दी झाली होती. श्री जोतिबा मंदिर परिसर, जोतिबा ते यमाई देवी मंदिर मार्ग तसेच डोंगरावरील परिसरात या गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला.
फिर्यादीचे नाव व कंसात चोरीला गेलेले सोनेअक्षय कृष्णात खाडे रा. जठारवाडी ता. करवीर (१० ग्रॅम), रवींद्र राजाराम घडेल रा. पन्हाळा (२० ग्रॅम), सौरभ कांबळे रा. ढवळेश्वर ता. खानापूर (२० ग्रॅम), आकाश विठ्ठल माने, रा. माळवाडी, भिलवडी जि. सांगली (४५ ग्रॅम), प्रदीपकुमार लालजी मालवीय रा. आर. के. नगर कोल्हापूर (२० ग्रॅम), स्वरूप प्रदीप शेटे रा. सागाव जि. सांगली (४० ग्रॅम), रोहीत श्रीकांत बुचडे कोल्हापूर (१२ ग्रॅम) नितीन नामदेव देसाई कोडोली ता. पन्हाळा (१८ ग्रॅम ७९० मिली), दिपक गणपतराव आडकुळकर शहापूर, बेळगाव (१२.५०० मिलीग्रॅम) परशुराम यल्लाप्पा पाटील उचगाव कोल्हापूर (१२. ५०० मिलीग्रॅम), निशांत सुकुमार पाटील पाचगाव कोल्हापूर (१० ग्रॅम), रोहीत बुचडे यांनी फिर्याद दिली आहे.

Advertisement

यातील फिर्यादी विलंबाने दाखल होत आहेत.चोरी प्रकरणी प्रविण उर्फ पवन अनिल जाधव वय २४ रा. पोखरमोह ता. शिरूर व नागेश जवाहरलाल देवकते वय ३७ रा. सरगम चौक, पंढरपूर यांना पोलीसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी ही कारवाई केली आहे. कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुगटे तसेच सहा. फौजदार हावलदार पोलीस कर्मचारी या चोरीचा तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.