For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Crime News: रत्नागिरीत भरदिवसा सव्वा लाखाची चोरी, दरवाजाचे कुलूप तोडले

12:43 PM Jul 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
crime news  रत्नागिरीत भरदिवसा सव्वा लाखाची चोरी  दरवाजाचे कुलूप तोडले
Advertisement

                                                             अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

Advertisement

रत्नागिरी:  शहरातील नाचणे रोडवरील दैवज्ञ भवनजवळ सचिन ज्ञानेश्वर टेकाळे यांच्या घरात भरदिवसा चोरट्याने चोरी केली. चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील लॉकरमधून 1,26,700 रूपये किंमतीचे दागिने चोरून नेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जुलै रोजी दुपारी 12 ते 12.30 वाजण्याच्या दरम्यान श्रीयश, दैवज्ञ भवन येथे ही घरफोडी झाली. घरफोडीत चोरट्याने 2 तोळ्यांचे काळे व सोन्याचे मण्यांचे मंगळसूत्र (80 हजार रु. किंमत), सोन्याची 5.500 ग्रॅमची 20 हजाराची चेन, गळ्यातील 1 ग्रॅम वजनाची व 4 हजार रुपये किंमतीची 2 सोन्याची पाने, सोन्याचे 1.400 सोन्याचे कानातील दागिने त्याची किंमत 4800 रु., सोन्याचे 3 ग्रॅम वजनाचे 12 हजार रुपये किंमतीचे कानातील रिंग, 150 ग्रॅमची 400 रु. किंमतीची नाकातील फुली, चांदीच्या तीन 40 ग्रॅमच्या 3 हजाराच्या चैनी, 15 हजार रु. किंमतीचे 14 ग्रॅमचे चांदीचे पैंजण, चांदीच्या 9 ग्रॅम वजनाच्या तीन 1 हजार रुपये किंमतीच्या अंगठ्या असा मोठा ऐवज चोरून नेला. या घटनेप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात सचिन टेकाळे यांनी तक्रार दिली.

त्यावरून पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 च्या कलम 305 (अ), 331 (3) नुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.