For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घातपाताच्या कृत्यांसाठी तरुणांना करत होते तयार

06:35 AM Jun 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
घातपाताच्या कृत्यांसाठी तरुणांना करत होते तयार
Advertisement

अटकेतील दोन संशयित दहशतवाद्यांकडून खळबळजनक माहिती उघड

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेंगळूर

Advertisement

तुमकूर शहर पोलिसांनी अटक केलेले दोन संशयित दहशतवादी देशात घातपाताच्या कृत्यांसाठी तऊणांचा एक गट तयार करत असल्याची खळबळजनक माहिती चौकशीदरम्यान समोर आली आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याच्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी तुमकूरच्या श्री रामनगर येथील रहिवासी अल्लाबक्ष आणि दावणगेरे बिडी कॉलनीतील रहिवासी जमीर खान यांना अटक करून त्यांची चौकशी केली असता ही धक्कादायक बाब उघडकीस आली.

पाकिस्तानी दहशतवादी राणाच्या संपर्कात आल्यानंतर, अल्लाबक्षने इन्स्टाग्रामवर ‘राणा भाई भाई’ या नावाने सेव्ह केले होते. नंतर त्यांच्यात हिंदीमध्ये झालेल्या संभाषणाची माहिती पोलिसांना मिळाली. दहशतवादी राणाच्या भाषणाने अल्लाबक्ष प्रभावीत झाला होता. काम कोणतेही असो, मला तुमचाच समज. मी निश्चित ते काम करेन, असे आश्वासन अल्लाबक्षने दिले होते, हे चौकशीदरम्यान पोलिसांना समजले आहे. शिवाय, आपण एकत्र आहोत. आपण समाजासाठी काम केले पाहिजे, असे अल्लाबक्षने म्हटल्याचे चौकशीदरम्यान उघडकीस आले आहे. त्याचवेळी, जे आपल्या धर्माचा द्वेष करतात, त्यांना आपण नष्ट केले पाहिजे. यासाठी, राणाने त्याला 50 ते 60 तऊणांचे पथक तयार करून त्यांना प्रशिक्षण देण्यास सांगितले. तसेच त्याचा खर्च उचलण्याचे वचन देऊन अल्लाबक्षला आमिष दाखवल्याची स्फोटक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

भारतात इतर कोणाशी संपर्क साधला आहे का, असे संशयित दहशतवादी अल्लाबक्षने राणाला विचारले असता त्याची ओळख दावणगेरेच्या जमीर खानशी करून दिली. हे दोघे राणाच्या मार्गदर्शनाखाली एक देशविरोधी कृत्य करण्याचा कट रचत असल्याची महत्त्वाची माहिती केंद्रीय गुप्तचर संस्थेला (सीआयए) मिळाली होती. त्यांनी तात्काळ राज्य गुप्तचर संस्थेला (एसआयए) सतर्क केले. ही माहिती तुमकूर शहर पोलिसांना देण्यात आली. यानंतर संयुक्त कारवाई करून दोन्ही संशयित दहशतवाद्यांना सापळ्यात अडकवण्यात यश मिळवले. पोलीस चौकशीदरम्यान दहशतवादी कटाबद्दल अधिक तपशील गोळा करत आहेत.

Advertisement
Tags :

.