त्यांनी उद्योगपतींच्या घरासमोर बॉम्ब लावले.
खासदार श्रीकांत शिंदे यांची ठाकरेंवर टीका : महायुतीचा राजापूरला मेळावा
शहर वार्ताहर
राजापूर
यापूर्वीच्या सरकारने उद्योग आणण्याऐवजी उद्योगपतीच्या घरासमोर बॉम्ब लावण्याचे काम केले. अडीच वर्षात त्यांनी स्वतःला घरात बंद करून ठेवले होते आणि पूर्ण महाराष्ट्रालाही बंद केले होते, अशी टीका खासदार श्रीकांत शिदे यांनी आघाडी सरकार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली. बॉम्ब लावण्याचे काम केलेच, शिवाय त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाझे नावाचा माणूस ठेवला होता. त्याला अटक केल्यावर वाझे काय ओसामा बिन लादेन आहेत काय? अशी प्रतिक्रिया दिली. ज्याने उद्योगपतीच्या घरासमोर बॉम्ब लावण्याचे काम केले, त्यांना संरक्षण दिले जात असेल तर अशा
परिस्थितीत महाराष्ट्रात उद्योग कसे येणार, असा सवाल शिंदे यांनी केला. महायुती सरकारच्या काळात सव्वादोन वर्षात १ लाख १७ हजार कोटीची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आज राज्य उद्योगात नंबर एकचे बनल्याचेही ते म्हणाले.