महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हॉटेलमध्यें मार खायचे देतात पैसे

06:19 AM Dec 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हॉटेलमध्ये जाऊन जेवणे जवळपास प्रत्येकालाच आवडत असते. अनेक हॉटेलमध्ये प्रवेश करताना ग्राहकांचे विशेष स्वागत करण्यात येते. पण एका देशात असे एक हॉटेल आहे, जेथे ग्राहकाने प्रवेश करताच त्याच्या कानाखाली लगावली जाते, कानाखाली लगावण्यासाठी हे हॉटेल जगभरात प्रसिद्ध आहे. या हॉटेलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून प्रथम स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. अनेक युजर्सनी या व्हिडिओवर स्वत:ची प्रतिक्रिया दिली आहे. या हॉटेलमध्ये लोक मार खाण्यासाठी पैसे देत असतात. या हॉटेलचे नाव शचिहोकोया-या आहे. हे जपानमधील नागोया येथे आहे.

Advertisement

या रेस्टॉरंटमध्ये मार खाण्यासाठी लोकांना पैसे द्यावे लागतात. गालावर मारण्यासाठी लोक 300 जपानी येन म्हणजेच 169 रुपये खर्च करतात. हॉटेलमध्ये प्रवेश करताच ग्राहकांच्या कानाखाली लगावली जात असल्याचे व्हिडिओत दिसून येते. कानाखाली इतक्या जोरात लगावली जाते की लोक स्वत:वरील नियंत्रणच गमावून बसतात.

Advertisement

या रेस्टॉरंटमध्ये लोक केवळ जेवणासाठी नव्हे तर थप्पड लगावून घेण्यासाठी येत असतात. ग्राहकांना येथे वेट्रेसच कानाखाली लगावत असते. ग्राहकांना खाण्यापिण्याप्रमाणेच थप्पड लगावून घेण्याचेही पैसे द्यावे लागतात.

हे रेस्टॉरंट 2012 मध्ये सुरू करण्यात आले होते, काही काळानंतर हे रेस्टॉरंट बंद पडण्याच्या मार्गावर होते, पण या हॉटेलला प्रसिद्धी मिळाल्याने येथे लोकांची मोठी गर्दी होऊ लागली. आता येथे लोकांची मोठी गर्दी होऊ लागल्याने रेस्टॉरंटमध्ये नव्या कर्मचाऱ्यांची भरती करावी लागली आहे. लोकांना एवढं का मारले जातेय अशी विचारणा एका युजरने हा व्हिडिओ पाहून केली आहे. हा मार खाण्याची किंमत मला मोजावी लागली तर मी येथे कधीच जाणार नाही असे दुसऱ्या युजरने म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article