For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Miraj Crime | कोयता घेऊन आले, शिवीगाळ केली अन् दुकानावर तुटून पडले; मिरजेतील गवळी गल्लीत टोळक्याचा राडा

04:45 PM Apr 26, 2026 IST | NEETA POTDAR
miraj crime   कोयता घेऊन आले  शिवीगाळ केली अन् दुकानावर तुटून पडले  मिरजेतील गवळी गल्लीत टोळक्याचा राडा
Advertisement

                               मिरजेत कोयता गँगचा धुमाकूळ

Advertisement

मिरज : शहरातील गवळी गल्लीयेथे कोयता घेऊन आलेल्या दोघा नशेखोरांनी दहशत करीत पानटपरीसह किराणा दुकानाची तोडफोड करुन नुकसान केले. याबाबत अरबाज हुसेन सारवान (वय २४, रा. बोकड चौक, मिरज) यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयीत सद्दाम नदाफ (रा. मुजावर प्लॉट, सांगली) व समर्थ राजू पवार (रा. ज्योतिबा मंदिराजवळ, सांगलीवाडी) अशा दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

गवळी गल्ली येथे अरबाज सारवान हे पानटपरी असताना संशयीत सद्दाम नदाफ व समर्थ पवार असे दोघेजण दुचाकीवरुन आले. त्यांनी सारवान यांना शिवीगाळ करुन सलमान बागवान कहा रहता है, असे विचारुन अचानक कोयत्याने हल्ला केला. कोयता छातीला लागण्याच्याआधीच सारवान हे खाली वाकल्याने बचावले. त्यानंतर जीव वाचविण्यासाठी सारवान हे पानटपरीच्या पाठीमागील
दरवाजातून पळून गेले.

Advertisement

त्यानंतर संशयीत हल्लेखोरांनी सारवान यांच्या पानटपरीची व लगत असलेल्या एका किराणा दुकानात कोयता मारुन साहित्यांची तोडफोड केली. व परिसरात दहशत माजवून दोघेजण दुचाकीवरुन निघून गेले. याबाबत मिरज शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा करुन गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोरांचा शोध सुरू आहे मिरजेत अशा घटनांमध्ये बाढ होत आहे.

Advertisement
Tags :

.