आरएसएसने लिहून दिलेली स्क्रिप्ट ते वाचत आहेत
परशुराम उपरकरांचा मंत्री नितेश राणेंना टोला
सावंतवाडी । प्रतिनिधी
मंत्री नितेश राणे हे इंग्लिश मीडियममध्ये शिकले आहेत त्यामुळे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळणार नाही. त्यामुळे आता त्यांना इतिहासाचे पुस्तक कुरिअर पाठवणार असा टोला आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार तथा शिवसेना नेते परशुराम उपरकर यांनी लगावला.ज्या जिल्ह्यात आणि राज्यात हिंदू आणि मुस्लिम गुण्यागोविंदाने नांदत आहेत त्या ठिकाणी दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न नितेश राणे करत आहे हे त्यांना शोभत नाही. आरएसएसने लिहून दिलेली स्क्रिप्ट ते वाचत आहे असाही टोला त्यांनी लगावला. सावंतवाडी येथील पर्णकुटी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत उपरकर बोलत होते. यावेळी शब्बीर मणियार, आशिष सुभेदार ,जावेद शहा आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी श्री उपरकर यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली ते म्हणाले मंत्री म्हणून राज्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या नितेश राणे यांनी जिल्ह्यात आणि राज्यात मुस्लिमांच्या विरोधात मोहीम उघडली आहे त्यांच्या विरोधात ते बोलत आहेत. मात्र वस्तूस्थिती लक्षात घेता सिंधुदुर्ग आणि राज्यातील हिंदू मुस्लीम जनता गुण्यागोविंदाने नांदत आहेत . या ठिकाणी हिंदू मुस्लिम असा कोणताही भेदभाव केला जात नाही. अशा परिस्थितीत दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता येणाऱ्या काळात त्यांना जनता जागा दाखवेल.श्री राणे यांनी आपल्या निवडणुकीत कोणत्याही मुस्लिम धर्माच्या धर्मियांचे मत घेणार नाही असा पण केला होता . मात्र ,निवडणूक झाल्यानंतर ते आता भाजपमध्ये मुस्लिम धर्मियांना का प्रवेश घेत आहेत . आता त्यांना धर्म दिसत नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी ते पुढे म्हणाले शिवाजी महाराजांच्या सोबत स्वराज्याच्या लढ्यात कोणीही मुस्लिम नव्हते असे सांगून नवा वाद पेटवण्याचे काम श्री राणे यांनी केले आहे ही स्क्रिप्ट ही आरएसएसची आहे त्यांच्या माध्यमातून ते बोलत आहेत. प्रत्यक्षात त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासमाहित नाही. इंग्लिश मीडियम मध्ये शिकले असल्यामुळे त्यांना तो धडा नव्हता. त्यामुळे त्यांनी तो माहिती करून घ्यावा. अन्यथा आम्ही त्यांना पुस्तक कुरिअरने पाठवू असे ते म्हणाले. दोन धर्मातन तेढ निर्माण केले जात असल्याने योग्य नाही . आज येथे पाडण्यात आलेले बांधकाम चुकीचे आहे. एखाद्या व्यक्तीला जाती धर्मावर टार्गेट करणे पालकमंत्र्याला शोभा देत नाही असे उपरकर म्हणाले.