या लोकांना होत नाहीत वेदना
कारण जाणून घेतल्यावर व्हाल चकित
आपण सर्वांनी जीवनात कधी ना कधी वेदनेचा अनुभव घेतला असेल. एखादी छोटी ईजा असो किंवा मोठा आजार, वेदना आमच्या जीवनाचा एक खास हिस्सा आहे. वेदनाच आपल्याला धोक्याची जाणीव करून देते. परंतु जगात काही असे लोक आहेत, ज्यांनी कधीच वेदनेचा अनुभव घेतलेला नाही. या लोकांना ईजा झाली किंवा शरीराचा एखादा हिस्सा कापला गेला तरीही वेदना होत नाहीत.
जगातील काही लोकांना एक दुर्लभ जन्मजात विकार असतो, ज्याला कांगेनिटल इंसेसिटिव्हिटी टू पेन म्हटले जाते. या विकाराने पीडित लोकांना वेदनेचा अनुभव होत नाही. याचा अर्थ जखम होणे, जळणे किंवा कुठल्याही प्रकारच्या वेदनादायक अनुभवानंतरही त्यांना वेदना होत नाहीत.
सीआयपीएचे कारण एका गुणसुत्रातील उत्परिवर्तन असते. हे गुणसूत्र तंत्रिका तंत्राला संदेश पाठविण्याचे काम करते, की शरीराला वेदना होत आहेत. या गुणसुत्रात उत्परिवर्तन झाल्याने तंत्रिका तंत्राला वेदनेचा संकेत मिळू शकत नाही आणि व्यक्तीला वेदनेची जाणीव होत नाही.
पीडितांमध्ये दिसून येतात लक्षणे
वेदनेचा अभाव : या लोकांना कुठल्याही प्रकारच्या वेदनेची जाणीव होत नाही. ईजा झाली किंवा आजार झाला तरीही वेदना होत नाही.
तापमानाबद्दल असंवेदनशीलता : संबंधित लोकांना उष्णता किंवा थंडीची जाणीव कमी होते.
अधिक घाम येणे : सीआयपीएने पीडित लोकांना अधिक प्रमाणात घाम येत असतो.
वारंवार ईजा होणे : वेदनेचा अनुभव येत नसल्याने हे लोक अनेकदा जखमी होत असतात.
संक्रमण : जखमांमुळे या लोकांमध्ये संक्रमणाचा धोका अधिक असतो.
अनेक समस्या
सीआयपीएने पीडित लोकांसाठी जीवन सोपे नसते. त्यांना सातत्याने ईजा होऊ नये म्हणून सावध रहावे लागते. त्यांना स्वत:च्या आरोग्याची खास काळजी घ्यावी लागते आणि नियमित स्वरुपात डॉक्टरकडे जावे लागते.