डिसेंबर महिन्यात ...या नव्या गाड्या होणार लाँच
एसयुव्ही गटात 2 कार्स होणार लाँच : स्कोडा, होंडाचा समावेश
वृत्तसंस्था/ कोलकाता
डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली असून या महिन्यामध्ये विविध ऑटोमोबाईल कंपन्यांकडून आपल्या नव्या गाड्या सादर केल्या जाणार आहेत. यामध्ये एसयुव्ही गटातील दोन गाड्यांचा समावेश असणार असून 1 गाडी हायब्रीड सेदान प्रकारातील असेल, असेही सांगितले जात आहे.
स्कोडा कायलॅक
स्कोडा कायलॅक ही नवी गाडी याच आठवड्यामध्ये कंपनीकडून सादर केली जाणार आहे. झेक प्रजासत्ताकमधील कंपनीची ही कार एसयुव्ही गटामध्ये असणार असून स्प्लिट हेडलाईट आणि बटरफ्लाय फ्रंट ग्रील ही या गाडीची वैशिष्ट्यो असतील. या गाडीची किंमत किती असणार आहे याचे स्पष्टीकरण कंपनीने दिलेले नसून तज्ञांच्या मते 7 लाख 199000 इतकी किंमत या गाडीची असू शकते. ड्युअल टोन रंगाच्या योजनेवर केबिनची निर्मिती करण्यात आली असून 10.1 इंचाचा इन्फोटेन्मेंट सिस्टीम त्याचप्रमाणे आठ इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सोबत ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि रियर एअर कंडिशनर वेंटस् दिले जाणार आहे. 6 एअरबॅग या गाडीत असणार आहेत.
नवी अमेझ
होंडा कंपनीनेही आपली नवी गाडी सादर करण्याची योजना बनवली असून नवी अमेझ या आठवड्यामध्ये भारतीय बाजारात उतरवली जाऊ शकते. 4 डिसेंबरला ही गाडी लाँच होईल, असे सांगितले जात आहे. नव्या पिढीला पसंत पडणारे सेदान प्रकारातील अमेझ ही अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असेल. हनीकोंब फ्रंट ग्रील सोबत एलईडी टेल लॅम्प्स याला देण्यात आले आहेत. फ्लोटिंग इन्फोटेन्मेंट सिस्टीम, थ्री स्पोक स्टिअरिंग व्हील आणि सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यात दिले जाणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी म्हणून 6 एअर बॅग सोबत रियर पार्किंग कॅमेरा असणार आहे.
टोयोटा कॅमरी
हेंडा पाठोपाठ टोयोटा देखील आपली नवी कॅमरी सादर करण्याची योजना बनवत आहे. या सुधारित कॅमरी आवृत्तीत अनेक वैशिष्टांचा समावेश केला गेला आहे. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जागतिक स्तरावर ही गाडी सादर करण्यात आली आहे. सध्याला मात्र कॅमरी ही देशांतर्गत पातळीवर उत्पादित केली जात आहे. स्लीकर ग्रील नव्याने डिझाईन केलेले एलईडी हेडलाइट्स यामध्ये देण्यात आलेले असून केबिनमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्लेसोबत युएसबी ए आणि युएसबी सी पोर्ट देण्यात आलेले आहे. वायरलेस चार्जिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे. ही गाडी 11 डिसेंबरला बाजारात लाँच होईल.
किया सिरॉस
डिसेंबरमध्येच किया इंडिया देखील आपली एसयुव्ही गटातील नवी कार लॉन्च करायची योजना बनवत आहे. एसयुवी गटामध्ये कंपनी सिरॉस नावाची कार दाखल करणार आहे. एलईडी हेडलॅम्पसह एलईडी टेल लाईटचा देखील समावेश असणार आहे. टू स्पोक स्टिअरिंग व्हिल आणि ट्विन डिजिटल डिस्प्ले डॅशबोर्ड देण्यात आलेला आहे. इलेक्ट्रिक सनरुफचा समावेश करण्यात आला असून 360 डिग्रीचा कॅमेरा आणि ऑटोमॅटिक वायपर्स, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी या सुविधा देखील मिळणार आहेत. ही गाडी 19 डिसेंबर रोजी बाजारात उतरवली जाण्याची कंपनीची योजना आहे.