For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Breaking: कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदासाठी 'ही' नावे आघाडीवर

02:01 PM Jan 22, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur breaking  कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदासाठी  ही  नावे आघाडीवर
Advertisement

                     कोल्हापूर महापालिकेचे महापौरपद ओबीसीसाठी; इच्छुकांची नावे चर्चेत

Advertisement

कोल्हापूर : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी नुकतीच आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून, यामुळे आगामी निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या सोडतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, अनेक ठिकाणी दिग्गजांना संधी मिळाली आहे, तर काही ठिकाणी प्रस्थापितांचा हिरमोड झाला आहे.

अशातच राज्यात सर्वात चर्चेत असलेली कोल्हापूर महापालिकेच्या आगामी महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे, महापौरपदासाठी विविध पक्षांतील इच्छुकांची नावे चर्चेत आली आहेत. यंदा महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने, ओबीसीमधील नेत्यांकडे विशेष लक्ष केंद्रित झाले आहे.

Advertisement

ही नावे महापौरपदासाठी चर्चेत

यामध्ये कोल्हापुरमधून भाजपकडून ओबीसीमधील प्रमोद देसाई, विशाल शिराले, विजय उर्फ रिंकू देसाई आणि वैभव कुंभार यांची नावे महापौरपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून अजय इंगवले आणि अश्कीन आजरेकर ही नावे महापौरपदासाठी चर्चेत आहेत. त्यामुळे महापौर पदासाठी भाजप आणि शिवसेना गटामध्ये चूरशीची लढत होणार यात काही शंका नाही.

महापौरपदावर नेमकी कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण कोल्हापूरकरांचे लक्ष लागले असून, आगामी काही दिवसांत या नावांवर शिक्कामोर्तब देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement
Tags :

.