महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

महिला रोजगारांमध्ये ‘ही’ शहरे अव्वल

07:00 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जवळपास 37 टक्के महिलांना रोजगार : सिच्युएशन ऑफ वुमन एम्प्लॉयमेंट इन इंडियाच्या अहवालामधून माहिती सादर

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

देश वेगाने प्रगतीकडे वाटचाल करत आहे. यामध्ये महिलांचाही मोठा वाटा आहे. महिला जवळपास सर्वच क्षेत्रात प्रगती करत आहेत. सरकार महिलांच्या प्रगतीसाठी विविध योजना राबवत आहे, जेणेकरून महिलाही आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. देशात नोकरदार महिलांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नुकताच भारतातील नोकरदार महिलांच्या संख्येबाबत एक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये असे समोर आले आहे की, सध्या एकूण 69.2 कोटी महिलांपैकी 37 टक्के महिला नोकरीत आहेत. ज्या खासगी किंवा सरकारी क्षेत्रात काम करत आहेत, अशी माहिती ‘सिच्युएशन ऑफ वुमन एम्प्लॉयमेंट इन इंडिया’ या अहवालामधून समोर आली आहे.

‘ही’ शहरे आघाडीवर

यामध्ये पुणे, हैदराबाद आणि चेन्नई ही शहरे महिला रोजगाराच्या बाबतीत अव्वल आहेत. या शहरांमध्ये बहुतांश महिला काम करत आहेत. टॅलेंट सोल्युशन्स प्रदाता करियर नेट अहवाल देतात की कार्यकारी मंडळ आणि व्यावसायिक भूमिकांमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की 2023 मध्ये महाविद्यालयांमधून थेट रोजगार मिळवणाऱ्या 40 टक्के महिला होत्या. ज्या महिलांना किमान तीन वर्षांचा अनुभव आहे किंवा तीन ते सात वर्षांचा अनुभव आहे त्यांच्या संबंधित बँडमधील एकूण नियुक्त्यांपैकी 20-25 टक्के त्यांचे प्रमाण राहिले आहे. दिल्ली आणि एनसीआर वगळता इतर शहरांमध्ये नोकरदार महिलांची संख्या वाढत आहे.

महिलांची रोजगारामधील आकडेवारी

यामुळे महिलांचा वाढता आलेख

नोकरदार महिलांची संख्या वाढत आहे. कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी कंपन्या किंवा संस्थांनी उचललेल्या कठोर पावलांमुळे नोकरदार महिलांची संख्या वाढत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article