महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

या आहेत सर्वात वयस्कर भगिनी

07:00 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आपल्याला अधिकाधिक आयुष्य मिळावे, स्वास्थ्य मिळावे आणि इतरांचा सहवास मिळावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते, हे वैश्विक सत्य आहे. तथापि, प्रत्येकची ही इच्छा पूर्ण होत नाही, हेसुद्धा तितकेच सत्य आहे. काही भाग्यवानच असे असतात की, त्यांना दीर्घायुष्य मिळते आणि त्याचा आनंद उपभोगण्याइतके आरोग्यही लाभलेले असते. अशाच भाग्यवतींमध्ये अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या सहा भगिनींचा समावेश केला जातो. या भगिनींच्या आयुष्यांची गोळाबेरीज तब्बल 571 वर्षे इतकी भरते. याचाच अर्थ असा की त्यांचे प्रत्येकी वय जवळपास 100 वर्षे आहे.

Advertisement

या सर्व सहाजणी एकमेकींच्या सख्ख्या भगिनी आहेत. त्या जन्मापासून आजपर्यंत एकमेकींच्या सहवासात एकत्र रहात आहेत आणि विशेष म्हणजे या साऱ्या भगिनींची प्रकृती आजही चांगल्यापैकी सुदृढ आहे. त्यामुळे त्यांना जगातील सर्वात वयोवृद्ध भगिनी म्हणून संबोधले जाते. इतक्या प्रदीर्घ आयुष्यांमध्ये त्यांनी बरेच काही पाहिलेले आहे आणि सहनही केले आहे. दुसऱ्या महायुद्धापासून दोन वर्षांपूर्वीच्या कोरोना उद्रेकापर्यंत सारे काही चांगले-वाईट त्यांना प्रत्यक्ष ज्ञात आहे.
Advertisement

सध्याच्या काळात या सहा भगिनींपैकी एक नॉर्मा या ओहियो प्रांतात राहतात. तर ऊर्वरित पाच भगिनी लॉरेन, मॅक्सिन, डॉरिस, मार्गारेट आणि एल्मा या मिसुरी प्रांतात राहतात. कोणत्याही भावंडांमध्ये होतात तशी छोटी-मोठी भांडणे वगळता या भगिनींमध्ये मोठे विवाद कधी झाले नाहीत, असे एल्मा यांनी स्पष्ट केले आहे. या सर्व भगिनी संपूर्ण आयुष्यभर एकमेकींच्या सान्निध्यात राहिल्या, हे आगळे वेगळे वैशिष्ट्या म्हणून ओळखले जात आहे. अशा प्रकारची भावंडे जगात आज अन्यत्र कोठेही नाहीत. या भगिनींना एक बंधूही होते. त्यांचे नाव स्टॅन्ली होते. तेही दीर्घायुषी ठरले. ते या सर्वांपेक्षा मोठे होते. तथापि, एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यापैकी तीन भगिनींचा जन्म वेगवेगळ्या वर्षांमध्ये पण जुलै महिन्यात झाला आहे. त्यामुळे त्यांची आई जुलैत त्यांना सहलीला घेऊन जात असे. ही परंपरा या भगिनींनी आजही चालविली आहे, हे विषेश मानले जाते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article