For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यंदा दहावी विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क नाहीच

10:27 AM Feb 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
यंदा दहावी विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क नाहीच
Advertisement

बेंगळूर : गेल्या वर्षी दहावी विद्यार्थ्यांना 10 टक्के ग्रेस मार्क देण्यात आल्याने शिक्षण खात्याविरुद्ध जोरदार टीका करण्यात आली होती. त्यामुळे यंदाच्या दहावी वार्षिक परीक्षेत कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिले जाणार नाहीत, असे शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याचे मंत्री मधू बंगारप्पा यांनी स्पष्ट केले. सोमवारी बेंगळूरच्या राज्य शिक्षण संशोधक आणि प्रशिक्षण विभागाच्या (डीएसईआरटी) कार्यालयात दहावी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि परीक्षा निकालवाढीविषयी संवाद कार्यक्रम पार पडला. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षणमंत्र्यांनी विविध जिल्ह्यांच्या जिल्हा पंचायतींचे सीईओ, जिल्हा शिक्षणाधिकारी व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Advertisement

त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री मधू बंगारप्पा म्हणाले, मागील वर्षी दहावी परीक्षा तीन वेळा घेतल्याने गोंधळ निर्माण झाला होता. आता हा गोंधळ दूर झाला आहे. दहावी विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देऊ नयेत, अशी सक्त सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे. त्यामुळे यावेळच्या दहावी वार्षिक परीक्षेत कोणत्याही प्रकारचे ग्रेस मार्क नसतील. संवाद कार्यक्रमात अधिकाऱ्यांशी बोलताना मधू बंगारप्पा यांनी, दहावी वार्षिक परीक्षेतील निकालातील सुधारणेविषयी ठोस उपाययोजना आवश्यक आहेत. मुले शैक्षणिकदृष्ट्या मागे राहू नयेत यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे, मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शिक्षण खाते व सरकार अनेक उपक्रम राबवत आहे. दहावी व बारावी वार्षिक परीक्षा निकाल वृद्धीसाठी 20 कलमी कार्यक्रम जारी करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमधील परीक्षेची भीती व दडपण दूर करण्यावर भर दिला जात आहे, असे सांगितले.

हिजाबविषयी गृहमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय

Advertisement

हिजाबला मुभा देण्यासंबंधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मधू बंगारप्पा म्हणाले, हिजाबचा विवाद अद्याप न्यायालयात आहे. त्यामुळे विद्यार्थिनींना शाळेत हिजाब परिधान करून येण्यास मुभा द्यावी की नाही, यावर गृहमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.