For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | तिसरे महायुद्ध होईल, वैरण सोन्याची होईल ; मेतके भंडारा उत्सवात नाथांची भाकणूक

01:41 PM Mar 03, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   तिसरे महायुद्ध होईल  वैरण सोन्याची होईल    मेतके भंडारा उत्सवात नाथांची भाकणूक
Advertisement

                   ‘महागाईचा भस्मासुर वाढेल’; धक्कादायक भविष्यवाणी चर्चेत

Advertisement

सेनापती कापशी - भारत देशात समान नागरी कायदा येईल, महाराष्ट्र राज्यात नद्या जोड प्रकल्प येईल, जगाच्या तापमानात प्रचंड वाढ होईल, तीर्थक्षेत्र आप्पाचीवाडी प्रति शिर्डी तर मूळक्षेत्र मेतके प्रति पंढरपूर होईल..! अशी भाकणूक मूळक्षेत्र मेतके ता. कागल येथील सद्गुरु बाळूमामा व श्री हालसिद्धनाथ भंडारा उत्सवात करण्यात आली. भगवान डोणे (वाघापूरकर) यांनी भाकणूक केली. ही भाकणूक ऐकण्यासाठी मंदिरामध्ये पहाटे चार वाजण्यापूर्वीच गर्दी झाली होती.

महिला राजकारणात मोठी बाजी मारतील जात धर्मात वैरत्व वाढेल शर्यतीचा बसवा (बैल) माणसाला शाप देईल, मराठा सैनिक छातीचीढाल करून लढेल, पाकिस्तानचा चौथा विभाग भारतात येईल, साखर सम्राटाची खुर्ची डळमळीत राहील, ज्याच्या घरी धान्य तो शहाना
होईल, वैरण सोन्याची होईल. काँग्रेस पक्ष सत्तेपासून दूर राहिल, भगवा मोठ्या डौलाने मिरवेल, १२ महिने लग्नकार्य चालतील, पैशाच्या जोरावर न्याय मिळणार नाही. महागाईचा भस्मासुर सुटेल, गोरगरीब जनतेचे हाल होतील. १२ वर्षाचे बालपण, २६ वर्षाचे तरुणपण, ३५ वर्षाचे म्हातारपण येईल. समुद्रातील संपत्ती नष्ट पावेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार होईल. मेघराज उदंड हाय, पिवळ्या भस्माचा महिमा वाढत जाईल.

Advertisement

भारत देशात समान नागरी कायदा येईल, गोरगरीब जनता आनंदाचा क्षण बघतील, गुढ्या तोरणे बांधतील, महाराष्ट्र राज्यात नदी जोड प्रकल्प येईल, दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली येईल, भारत देश हिंदुराष्ट्र बनेल, भारत देशाचा जगात जयजयकार होईल. नदीकाठची जमीन ओसाड पडेल, साखरेचा भाव तेजी-मंदीत राहील, गुळाचा भाव वाढतच राहील,उसाच्या काकवी पासून औषध निर्मिती होईल, तंबाखूची पेंडी मध्यम पिकेल, धान्य उदंड पिकेल. मूग, तूर, सोयाबीन, कडधान्य उदंड पिकेल. दीड महिन्याचे धान्य पिकेल, वैरण बाळांनो सोन्याची होईल. ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल. दिवसा डाके दरोडे पडतील, सीमा प्रश्न राज्यकर्त्यांच्या चर्चेत राहील, गाई म्हशींचा भाव वाढत राहील. दुधाचा भाव वाढतच राहील, तंबाखूचा भाव गगनाला भिडेल. रोगराई वाढत जाईल, तरुण पिढी बरबाद होईल, मायेचे लेकरू मायला ओळखणार नाही. गाईचे वासरू गाईला भेटणार नाही. चालता बोलता मृत्यू येईल, उषाची भाकरी उशाला राहील, लाकूड सोन्याचे होईल. अशी भाकनुक सांगितली आहे. डोणे यांना सुरके म्हणून संजय वाघमोडे व तुकाराम डोणे यांची साथ लाभली.

महागाईचा भस्मासुर वाढेल
उसाच्या कांड्याने दुधाच्या भांड्याने राजकारणाला कलाटणी मिळेल. पैशाच्या जोरावर न्याय मिळेल, महागाईचा भस्मासुर वाढेल, पाण्याचा कप विकत मिळेल. पैसे दागिने घातक ठरतील, चांदीचा दर वाढत राहील, मरण स्वस्त होईल, खांद्यावरचा चाबूक खांद्यावर व हातातील भाकरी हातात राहील. तिसरे महायुद्ध होईल, निष्पाप बळी जातील चीन राष्ट्र भारतावर हल्ला करेल भारताचे सैनिक सडेतोड उत्तर देतील गुंडांचे राज्य चालेल मुस्लिम राष्ट्रांचा उध्वंस होईल, सीमा भागात मोठा गोंधळ माजेल, आंतरराष्ट्रीय अंडरवर्ल्ड डॉनची हत्या होईल. अशी भाकणूक करण्यात आली.

Advertisement
Tags :

.