For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘बेंड इट लाइक बेकहॅम’चा सीक्वेल येणार

10:59 AM Aug 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘बेंड इट लाइक बेकहॅम’चा सीक्वेल येणार
Advertisement

चित्रपट ‘बेंड इट लाइक बेकहॅम’ एका मुलीची फुटबॉलपटू होण्याची धडपड दाखविणारा होता. या चित्रपटात परमिंदर नागरा आणि कीरा नाइटली या अभिनेत्री मुख्य भूमिकेत होत्या. आता या चित्रपटाचा सीक्वेल तयार केला जाणार असल्याची माहिती दिग्दर्शिका गुरिंदर चड्ढा यांनी दिली आहे. मी चित्रपटाच्या सीक्वेलवरून अत्यंत उत्साही आहे. या चित्रपटाद्वारे आम्ही मुलींना फुटबॉल खेळण्यासाठी प्रेरित केले. मी स्वत:च्या या चित्रपटाचा वारसा पुढे नेण्यावरून आनंदी असल्याचे गुरिंदर यांनी म्हटले आहे. जुने कलाकार पुन्हा चित्रपटात दिसून येतील अशी अपेक्षा आहे. आमचे कलाकार चित्रपटाच्या कथेची प्रतीक्षा करत आहेत. प्रत्येकजण या चित्रपटात काम करू इच्छित असल्याचा विश्वास आहे. सर्वकाही पटकथेवर अवलंबून असणार असेल असे गुरिंदर यांनी म्हटले आहे. ‘बेंट इट लाइक बेकहॅम’ चित्रपटात जोनाथन राइस मेयर्स आणि अनुपम खेर यांनीही भूमिका साकारली होती. पटकथेवर कठोर मेहनत घेत आहोत. प्रत्येक व्यक्तिरेखेला संयुक्तिक करण्याच प्रयत्न असल्याचे गुरिंदर यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.