बेळगाव पब्लिक स्कूल शिंदोळीच्या खेळाडूंची निवड
प्रभारी सचिवांची अधिकाऱ्यांना सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावचे प्रभारी सचिव विपुल बन्साल यांनी शनिवारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. नुकसानग्रस्तांना भरपाई देताना विलंब होऊ नये, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.
शनिवारी जि. पं. सभागृहात विविध खात्याच्या जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलताना विपुल बन्साल म्हणाले, अतिवृष्टीमुळे पीकहानी झाली आहे. भरपाई देण्यासाठी संयुक्त सर्वेक्षणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. प्रत्येक ग्रा. पं. च्या कार्यक्षेत्रात ग्रामसभा आयोजित करणे सक्तीचे आहे.
गावागावात स्वच्छतेविषयी जागृती करण्याची सूचना
ग्रामसभेतील मागणीनुसार तयार करण्यात आलेल्या क्रिया योजनेवरून कामे पूर्ण करावीत. जिल्हा पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील विविध निवासी योजना पूर्ण करण्यासाठी दिलेले उद्दिष्ट गाठावे. ग्रा. पं. च्या कार्यक्षेत्रात घनकचरा व्यवस्थापनावर भर द्यावा, कचरा डेपो स्थापन करावा, गावागावात स्वच्छतेविषयी जागृती करण्याची सूचनाही विपुल बन्साल यांनी अधिकाऱ्यांना केली.
गर्लगुंजी येथील अंगणवाडी केंद्राची पाहणी
जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रलंबित असलेली कामे त्वरित पूर्ण करून पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी सूचना देतानाच विपुल बन्साल यांनी कित्तूर उत्सव व आगामी विधिमंडळ अधिवेशनाच्या तयारीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी कुमारस्वामी लेआऊट परिसरात असलेल्या अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थिनी वसतीगृहाला भेट देऊन पाहणी केली. याबरोबरच गर्लगुंजी येथील अंगणवाडी केंद्राची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी दिनेशकुमार मीना, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.