For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बर्म्युडा ट्रायंगलखाली काही तरी वेगळे आहे!

06:45 AM May 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
बर्म्युडा ट्रायंगलखाली काही तरी वेगळे आहे
Advertisement

दशकांपासून बर्म्युडा ट्रायंगल जगातील सर्वात रहस्यमय भागांपैकी एक मानले जात राहिले आहे. कधी जहाज गायब होण्याच्या कहाण्या, कधी चानक बेपत्ता झालेले विमान, तर कधी कंपास खराब होण्यासारख्या घटनांनी याला एलियन आणि इतर जगाशी जोडले, परंतु आता वैज्ञानिकांनी बर्म्युडा ट्रायंगलखाली काही तरी असे शोधले आडहेस, ज्याने या रहस्याला नवी दिशा दिली आहे.

Advertisement

जर्नल जियोफिजिकल रिसर्च लेटर्समध्ये प्रकाशित संशोधनानुसार बर्म्युडा बेटाच्या जवळपास 20 किलोमीटर खाली एक अत्यंत अनोखे खडकाळ आच्छादन मिळाले आहे. अशी संरचना आतापर्यंत अन्य कुठल्याही बेटाखाली पाहिली गेली नाही असे संशोधकांचे सांगणे आहे. बर्म्युडा ट्रायंगल अटलांटिक महासागराचा एक रहस्यमय भाग मानला जातो, ज्याला सर्वसाधारणपणे मियामी, सान जुआन आणि बर्म्युडाला जोडून निर्मित एक काल्पनिक त्रिकोणाच्या रुपात सांगण्यात येते. याचमुळे याला बर्म्युडा ट्रायंगल म्हटले जाते.

अखेर काय आढळले?

Advertisement

कार्नेगी सायन्स आणि येल विद्यापीठाच्या भूवैज्ञानिकांनी भूकंपाच्या तरंगांच्या मदतीने जमिनीच्या आतील 3डी इमेज तयार केले, यातून बर्म्युडाखाली सागरी पृष्ठभाग आणि मेंटलदरम्यान कमी घनत्वयुक्त जाड खडकावर आहे, जो एखाद्या ‘तरंगत्या प्लॅटफॉर्म’प्रमाणे काम करत असल्याचे कळले. कोट्यावधी वर्षांपूर्वी येथे ज्वालामुखी हालचाली संपुष्टात आल्यावर मॅग्मा जमा होत थंड झाला आणि यातूनच खडकाळ पाया निर्माण झाला. याचमुळे आजही बर्म्यूडा समुद्रावर स्थिर आहे, तर सर्वसाधारणपणे ज्वालामुखीय बेट काळासोबत खाली खचू लागते.

रहस्य उलगडले का?

या शोधाचा विमान दुर्घटना, जहाज गायब होणे किंवा कंपास बिघडण्यासारख्या घटनांशी थेट संबंध मिळाला नसल्याचे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे. युनायटेड स्टेट्स कोस्ट गार्ड समवेत अनेक यंत्रणांनी यापूर्वीच बर्म्युडा ट्रायंगलमध्ये असामान्य संख्येत दुर्घटना होण्याचा कुठलाच ठोस पुरावा नसल्याचे सांगितले आहे. या भागात तीव्र वादळ, उंच लाटा, हवामान अचानक बदलणे आणि मानवीय चुका दुर्घटनांचे मोठे कारण असू शकते असे तज्ञांचे सांगणे आहे.

शोध खास का?

हा शोध पृथ्वीच्या भूगर्भीय इतिहासाला समजून घेण्यास मोठी भूमिका पार पाडू शकतो असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. ही संरचना सुपरकॉन्टिनेंट ब्रेकप ऑफ पँगिया तूटत होता त्या काळातील असू शकते असे काही संशोधक मानत आहेत. अशाप्रकारची संरचना इतर सागरी बेटांखाली दडलेली असू शकते का? यामुळे महासागरीय बेटांच्या निर्मितीची वर्तमान थेअरी बदलणार का असा सवाल आता उपस्थित होत आहे. वैज्ञानिक आता याच प्रश्नांची उत्तरं शोधू पाहत आहेत.

बर्म्युडा ट्रायंगल

अमेरिकेच्या हवामान आणि समुद्राशी निगडित यंत्रणा एनओएए, युएस कोस्ट गार्ड आणि अनेक वैज्ञानिक संशोधनानुसार बर्म्युडा ट्रायंगललमध्ये जहाजं किंवा विमानं बेपत्ता होण्याच्या घटना जगातील इतर व्यग्र सागरी भागांपेक्षा अधिक नाहीत. बहुतांश दुर्घटना खराब हवामान, वादळ, मानवी चूक, नेव्हिगेशनमधील समस्या आणि समुद्राच्या उंच लाटांमुळे होत असतात. बर्म्युडा ट्रायंगलचे रहस्य बऱ्याचअंशी चित्रपट, कहाण्या आणि माध्यमांमुळे प्रसिद्ध झाले. प्रत्यक्षात हा एक सामान्य सागरी बाग आहे. जेथे वाहतूक अधिक असल्याने दुर्घटना देखील अधिक ऐकण्यास मिळतात. यात एलियन किंवा सुपरनॅचरल शक्ती यासारख्या गोष्टींचा कुठलाच पुरावा मिळालेला नाही असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :

.