For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्याकडून भरपूर काही शिकण्यासारखे!

10:21 AM Dec 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
गोव्याकडून भरपूर काही शिकण्यासारखे
Advertisement

राज्यपाल पुसापती गजपती राजू यांचे गौरवोद्गार : सेरेंडिपीटीला भेट देऊन घेतला कुलाकुसरीचा आनंद

Advertisement

पणजी : गोवा हे संस्कृतीप्रिय राज्य आहे. राज्यात अनेक संस्कृतींची शिकवण देणारे कार्यक्रम, उपक्रम राबविले जातात. कलाकार, कारागिर यांच्यासाठी तर गोव्याकडून भरपूर काही शिकण्यासारखे आहे. सेरेंडिपीटी महोत्सव हा त्याचाच भाग असून, या महोत्सवातील आकर्षक कलाकृती आणि त्याद्वारे देण्यात आलेले सामाजिक संदेश यामुळे हा महोत्सव नक्कीच कौतुकास पात्र आहे, अशा शब्दांत राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी गौरवोद्गार काढले. राजधानी पणजी शहरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचा काल, रविवारी समारोप झाला.

या समारोप कार्यक्रमापूर्वी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी सपत्नीक महोत्सवाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी प्रशासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी उपस्थित होते. राजधानी पणजीतील गोवा मनोरंजन संस्थेच्या परिसरात, आझाद मैदान त्याचबरोबर इतर ठिकाणच्या आयोजन करण्यात आलेल्या सेरेंडेपिटी महोत्सवाच्या ठिकाणाला राज्यपालांनी भेट देऊन तेथील कलाकुसर व त्यांची माहिती जाणून घेतली. गेल्या दहा दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या दहाव्या अनोख्या सेरेंडिपीटी महोत्सवामुळे राज्यात देश-विदेशातील नागरिक हा महोत्सव पाहण्यासाठी आले होते. अनेक कलाकार, कारागिर यांनी हजेरी लावून हा महोत्सव यंदाही यशस्वीरित्या पार पाडला.

Advertisement

Advertisement
Tags :

.