For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशाच्या 13 नद्यांमध्ये पाणीच नाही

06:19 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
देशाच्या 13 नद्यांमध्ये पाणीच नाही
Advertisement

गंगा समवेत अनेक नद्यांच्या खोऱ्यात     प्रवाह निम्म्यापेक्षा कमी

Advertisement

गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू, पेन्नार, नर्मदा, तापी, साबरमती, गोदावरी, महानदी, कावेरी यासह अन्य काही नद्यांमधील पाणी वेगाने कमी होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या नद्यांमध्ये कमी पाणी शिल्लक राहिले आहे, परंतु चिंता गंगेवरून आहे, ही नदी 11 राज्यांच्या 2.86 लाख गावांना सिंचन आणि पिण्यासाठी पाणी पुरविते.

केंद्रीय जल आयोगाच्या विश्लेषणानंतर नवी माहिती समोर आली आहे. भारताच्या 150 प्रमुख जलाशयांमध्ये पाणी साठविण्याच्या एकूण क्षमतेपेक्षा 36 टक्के पाणी कमी आहे. 86 जलाशयांमध्ये पाणी 40 टक्के किंवा त्याहून कमी पाणी आहे. बहुतांश जलाशय हे दक्षिणेकडील राज्ये, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आहेत.

Advertisement

 

हवामान विभागानुसार आंध्रप्रदेशात 65 टक्के तर तेलंगणात 67 टक्के पाणी कमी आहे. नद्यांमुळे पेयजल, जलवाहतूक आणि ऊर्जानिर्मिती होत असते, तसेच यामुळे सामाजिक-आर्थिक विकास होतो. आयोगाकडे 20 नद्यांच्या खोऱ्यातील लाइव्ह डाटा असतो. बहुतांश खोऱ्यांमध्ये 40 टक्क्यांच्या आसपास स्टोरेज क्षमता नोंदविली गेली आहे. 12 नद्यांच्या खोऱ्यांमध्ये पाण्याचा साठा मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. कावेरी, पेन्नार आणि कन्याकुमारीदरम्यान पूर्वेच्या दिशेने वाहणाऱ्या नद्या सर्वाधिक नुकसानीत आहेत. येथील साठा अत्यंत कमी आहे.

गंगा नदीच्या खोऱ्यात पाणी निम्म्यापेक्षा कमी

देशातील सर्वात मोठी नदी गंगा आहे. परंतु तेथे सध्या एकूण क्षमतेपेक्षा निम्म्याहून कमी पाणीसाठा आहे. म्हणजेच 41.2 टक्के पाणीच या खोऱ्यात आहे. हे मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत कमी आहे. गंगा नदीच्या खोऱ्यातील पाणी कमी झाल्याने कृषिक्षेत्र प्रभावित होणार आहे, कारण या खोऱ्याचा 65.57 टक्के भाग कृषीभूमी आहे. नर्मदेत 46.2 टक्के, तापीमध्ये 56 टक्के, गोदावरीत 34.76 टक्के, महानदीत 49.53 टक्के आणि साबरमतीत 39.54 टक्के पाण्याची कमतरता आहे.

येथील स्थिती अत्यंत खराब

महानदी आणि पेन्नादरम्यान पूर्वेच्या दिशेने वाहणाऱ्या 13 नद्यांमध्ये सध्या पाणीच नाही. रुशिकुल्या, वराह, बाहुदा, वंशधारा, नागावली, सारदा, तांडव, एलुरु, गुंडलकम्मा, तम्मिलेरु, मुसी, पलेरू आणि मुनेरू या नद्या आंध्रप्रदेश, तेलंगणा, ओडिशातून वाहतात. या नद्यांमधील स्थिती चिंताजनक आहे. या नद्यांमुळे 86.643 किलोमीटरचा भाग सिंचित होतो. मग या नद्या बंगालच्या उपसागरात सामावून जातात. यांच्या खोऱ्यात 60 टक्के हिस्सा कृषीक्षेत्राचा आहे. म्हणजेच यंदा पाण्याच्या कमतरतेचा प्रभाव तेथील पिकांवर पडणार आहे.

आयआयटी गांधीनगरचे अध्ययन

आयआयटी गांधीनगरकडून संचालित भारत सुखा मॉनिटरनुसार नदी खोऱ्याच्या सीमांच्या आत अनेक क्षेत्रं ‘अत्याधिक’पासून ‘असाधारण’ दुष्काळाला सामोरे जात आहेत. देशात 35.2 टक्के क्षेत्र सध्या ‘असामान्य’ ते ‘असाधारण’ दुष्काळाच्या श्रेणीत आहेत. यातील 7.8 टक्के भाग ‘अत्याधिक’ दुष्काळात आहे. 3.8 टक्के भाग ‘असाधारण’ दुष्काळात आहे. कर्नाटक आणि तेलंगणा यासारखी राज्ये कमी पाऊस किंवा दुष्काळसदृश स्थितीला सामोरी जात आहेत.

Advertisement
Tags :

.