कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पूजा नाईकच्या आरोपात नाही तथ्य

01:08 PM Nov 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राजकारण्याच्या नावाचा उल्लेख नाही : अधीक्षक राहूल गुप्ता यांची माहिती 

Advertisement

पणजी : कथित नोकरी घोटाळ्यासंदर्भात संशयित पूजा नाईकने आतापर्यंत केलेल्या दाव्यांची सत्यता पडताळून पाहिली असता, अनेक दावे चुकीचे असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे सिद्ध झाले आहे, अशी माहिती गुन्हा शाखेचे अधीक्षक राहूल गुप्ता यांनी काल गुरुवारी दिली. आरोप गंभीर असल्याने तपास सुरूच राहील. गुन्हा शाखा सध्या नोंदवलेल्या जबाबांचे विश्लेषण करत असून, या प्रकरणात भविष्यातील पुढील कारवाई काय करायची, याचा निर्णय घेणार आहे. या घोटाळ्यातील शेकडो पीडितांकडून नोकरीचे आश्वासन देऊन मोठी रक्कम उकळल्याच्या आरोपांचीही चौकशी सुरू आहे. पूजा नाईक हिने अद्याप कोणत्याही राजकारणी व्यक्तीचे नाव घेतलेले नाही, असेही गुप्ता यांनी सांगितले. रायबंदर येथील गुन्हा शाखेच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अधीक्षक राहूल गुप्ता बोलत होते. नोकरी घोटाळ्यासंदर्भातील या प्रकरणाला एक वर्ष झाल्यानंतर संशयित पूजा नाईक हिने पुन्हा यंदा 9 नोव्हेंबर रोजी कथित नोकरी घोटाळ्यासंदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला. ज्यामध्ये तिने 2019-2022 दरम्यान विविध सरकारी खात्यांमध्ये सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी दोन सरकारी अधिकाऱ्यांना 17.68 कोटी ऊपये दिल्याचा दावा केला होता.

Advertisement

पूजा नाईकची पाच तास उलटतपासणी 

याबाबत गुन्हा शाखेने पूजा नाईक हिला समन्स बजावून उलटतपासणीसाठी बोलावण्यात आले होते. तिची सुमारे 5 तास उलटतपासणी करण्यात आली. पूजा नाईक हिच्यावर यापूर्वीच नोकरी घोटाळ्याच्या 5 प्रकरणांमध्ये आरोप आहे. तिला अटकही झाली होती, नंतर ती 21 नोव्हेंबर 2024 रोजी जामिनावर बाहेर आली.

बीएनएस 173 (3) अंतर्गत तपास

यापूर्वी तिने पोलिसांना दिलेल्या जबानीत कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याबद्दल काहीही नोंद नाही. पूजा नाईक हिने घोटाळ्यात सहभागी असलेल्या दोन सरकारी अधिकाऱ्यांचे नाव घेतलेल्या आरोपांची गुन्हे शाखा भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 173(3) अंतर्गत तपास करीत आहे, असेही गुप्ता म्हणाले.

‘त्या’ फ्लॅटमध्ये राहत होते विद्यार्थी

पूजा हिने शेकडो अर्जदारांकडून सरकारी नोकरी देण्याच्या आश्वासनाखाली मोठी रोख रक्कम घेतल्याचे अनेक आरोप आहेत. त्यापैकी एक आरोप असा होता की पीडीए कॉलनीमध्ये एक फ्लॅट आहे. जिथे हा व्यवहार होत होता. परंतु गुन्हा शाखेने फ्लॅट मालकाशी चौकशी केली असता त्याने सांगितले की 2019 पासून त्या फ्लॅटमध्ये फक्त हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी राहत आहेत. पूजा नाईक हिने केलेल्या आरोपांच्या प्रत्येक पैलूची काळजीपूर्वक तपासणी करत आहे. जी प्रत्यक्षात पाहता जुळवाजुळव होत नसल्याचे दिसून येते. तिचे काही आरोप प्रथमदर्शनी इतर उपलब्ध नोंदी, माहितीशी जुळत नाहीत, म्हणून सखोल तपासणी करणे आवश्यक आहे, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article