महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सोमनाथ परिसरात बुलडोझर अॅक्शनला स्थगिती नाही

06:45 AM Oct 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी : अतिक्रमण हटविण्याची कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने गुजरातमध्ये सोमनाथ मंदिरानजीक जारी बुलडोझर अॅक्शनवर स्थगिती देण्यास तूर्तास नकार दिला आहे. न्यायालयाने सोमनाथ मंदिरानजीक ईदगाह आणि दरगाह समवेत अनेक अवैध बांधकाम आणि अतिक्रमणाच्या विरोधात बुलडोझर कारवइा& करण्यावरून गुजरात सरकारकडून स्पष्टीकरण मागविले आहे. न्यायालयात आता याप्रकरणी 16 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

सोमनाथ मंदिरानजीक गुजरातच्या प्रभास पाटनमध्ये दरगाह आणि मशिदींसमवेत अनेक बांधकामे पाडविण्याच्या विरोधात जैसे थे स्थिती राखण्याचा आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. परंतु न्यायालयाच्या मागील निर्देशांचे उल्लंघन आढळून आले तर राज्याच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

बुलडोझर कारवाईवरील स्थगितीच्या आदेशाचे कुठल्याही प्रकारचे उल्लंघन आढळून आल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील. न्यायालयीन आदेशांच्या पालनाबद्दल कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाऊ शकत नाही असे न्यायाधीश भूषण गवई आणि के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.

आम्ही नोटीस किंवा कुठल्याही प्रकारचा अंतरिम आदेश जारी करत नाही, परंतु राज्याने आमच्या मागील आदेशाचा अवमान केल्याचे आढळून आल्यास आम्ही अधिकाऱ्यांना तुरुंगात पाठवू तसे जैसे थे स्थिती कायम राखण्याचा आदेश देऊ असे खंडपीठाने नमूद केले आहे.

सुम्मास्त पाटनी मुस्लीम समुदायाकडुन दाखल याचिकेत गुजरातच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात अवमानाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 17 सप्टेंबर रोजी बुलडोझर कारवाईला स्थगितीचा निर्देश दिला होता. परंतु हा आदेश रस्ते, फुटपाथ किंवा अवैध बांधकामांकरता लागू होणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article