For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तूर्तास मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा नाही

06:38 AM Jan 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
तूर्तास मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा नाही
Advertisement

झामुमोच्या बैठकीत निर्णय : हेमंत सोरेनच राहणार मुख्यमंत्रिपदी

Advertisement

वृत्तसंस्था/ रांची

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी बुधवारी महत्त्वाची बैठक झाली आहे. या बैठकीत सोरेन यांनी तूर्तास मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ नये असा निर्णय सत्तारुढ आघाडीकडून घेण्यात आला आहे. ईडीकडून कारवाई होण्याच्या भीतीपोटी झारखंड मुक्ती मोर्चाकडून अन्य नेत्याला मुख्यमंत्रिपद दिले जाऊ शकते अशी चर्चा यापूर्वी सुरू होती. हेमंत सोरेन हे स्वत:ची पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री करू शकतात असा कयास वर्तविला जात होता. परंतु आणखी काही काळ हेमंत सोरेन हेच मुख्यमंत्री असतील हे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

कुठल्याही प्रकारच्या स्थितीला सामोरे जाण्याच्या रणनीतिवर या बैठकीत चर्चा झाली आहे. आमदारांना कुठल्याही स्थितीसाठी तयार आणि एकजूट राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच साशल मीडियावरील कुठल्याही प्रकारच्या चर्चेपासून दूर राहण्याची ताकीद देण्यात आली आहे. या बैठकीत झामुमोचे 27 तर काँग्रेसचे 15 आणि राजदचा एक आमदार सामील झाला आहे. बैठकीला काँग्रेसचे दोन तर झामुमोचा एक आमदार अनुपस्थित होता.

हेमंत सोरेन यांच्या ईडीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. ईडीकडून भूखंड घोटाळ्याशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी हेमंत सोरेन यांची चौकशी केली जाणार आहे. ईडीकडून हेमंत सोरेन यांना आतापर्यंत सातवेळा समन्स बजावण्यात आला आहे.  हेमंत यांनी सातत्याने या समन्सचे पालन करणे टाळले आहे. अशा स्थितीत ईडीकडून सोरेन यांच्या निवासस्थानी जात चौकशी केली ज्रा शकते किंवा त्यांना अटकही होऊ शकते.

ईडीने 29 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना समन्स बजावून चौकशीसाठी स्वत:ची तारीख, वेळ आणि ठिकाण कळविण्यास सांगितले होते. ईडीने याकरता त्यांना दोन दिवसांची मुदत दिली होती. हेमंत सोरेन यांनी यावर चौथ्या दिवशी उत्तर दिले होते.

ईडीने निष्पक्ष चौकशी केल्यास आपण सर्वप्रकारची मदत करण्यास तयार आहोत. यापूर्वीही चौकशी झाली असून यापुढेही चौकशीसाठी तयार आहे. माझ्या मालमत्तेची पूर्ण माहिती पुरविली असल्याचे हेमंत सोरेन यांनी नमूद पेले आहे.

Advertisement
Tags :

.