For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यात गॅस सिलिंडरची समस्या नाही

06:17 AM Mar 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
राज्यात गॅस सिलिंडरची समस्या नाही
Advertisement

अन्न-नागरी पुरवठामंत्री के. एच. मुनियप्पा यांचे स्पष्टीकरण

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

मध्य-पूर्वेतील युद्धामुळे राज्यातील अनेक भागात गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याच्या वृत्तांदरम्यान, राज्यात घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी गॅस सिलिंडर पुरवठ्यात सध्या कोणतीही समस्या नसल्याची माहिती गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सरकारला दिली आहे, असे अन्न-नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी बुधवारी स्पष्ट केले. बेंगळुरातील आहार भवनात आयओसी, बीपीसी, एचपीसी, जीएआयएलच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

Advertisement

आम्ही अमेरिका, आखाती देश आणि रशियासारख्या अरब देशांमधून आमच्या देशात गॅस उत्पादने आयात करतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धामुळे गॅस व्हेसेल (जहाजांना) झालेल्या नुकसानीमुळे आम्हाला गॅसची समस्या असून ग्राहकांनी कोणतीही काळजी करू नये, असेही त्यांनी सांगितले.

आम्ही सामान्यपणे नागरिक वापरत असलेल्या घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅसवर चर्चा केली आहे. दररोज सुमारे 1000 मेट्रिक टन म्हणजे सुमारे 50,000 व्यावसायिक सिलिंडर (19 किलो) लागतात. सुमारे 5,000 मेट्रिक टन म्हणजे सुमारे 3,50,000 सिलिंडर (14.2 किलो) घरगुती वापरासाठी लागतात. कर्नाटक राज्याची ही दररोजची गरज आहे, असेही मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.