वाघाच्या मृत्यूमागे शिकारीची शक्यता नाही
02:48 PM May 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वनमंत्री विश्वजित राणे यांचा दावा
Advertisement
पणजी : साकोर्डा येथे मृतावस्थेत वाघ आढळल्यानंतर या प्रकरणाने शंका-कुशंका निर्माण झाल्या होत्या. वाघाचा मृत्यू की, शिकार ह्याचा संभ्रम असतानाच वनमंत्री विश्वजित राणे यांनी वाघाच्या मृत्यूमागे शिकारीची शक्यता नाही, असा दावा केला आहे. या प्रकरणातील प्राथमिक निष्कर्षांचा संदर्भ देत राणे यांनी ठामपणे सांगितले की, ‘शिकार झालेली नाही.’ वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विभागाला सादर केलेल्या अहवालानुसार, मृतदेहाच्या विघटनाची प्रगत अवस्था झाल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही. वाघाचा मृत्यू ज्या भागात झाला त्या भागाच्या सभोवतालच्या परिस्थितीचा तपास करण्यात आला आहे. विविध नमुने विषविज्ञान, न्यायवैद्यक आणि डीएनए विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत, असे वनमंत्री राणे यांनी पुढे सांगितले.
Advertisement
Advertisement