For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मासिक पाळी दरम्यान ‘पेड लिव्हची’ गरज नाही : स्मृती इराणी

02:48 PM Dec 14, 2023 IST | Kalyani Amanagi
मासिक पाळी दरम्यान ‘पेड लिव्हची’ गरज नाही   स्मृती इराणी
Advertisement

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी मासिक पाळीबद्दल मोठे विधान केले आहे. मासिक पाळी हे काही अपंगत्व नसून पेड लिव्ह धोरणाची गरज नाही असे त्या म्हणाल्या आहेत.राष्ट्रीय जनता दलाचे सदस्य मनोज कुमार झा यांनी देशातील मासिक पाळी स्वच्छता धोरणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना इराणी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Advertisement

महिलांना मासिक पाळी दरम्यान, पगारी सुट्टी देण्याबाबत विधेयक आणण्याची तयारी केंद्र सरकार तर्फे करण्यात येत आहे. दरम्यान केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मोठे विधान केले आहे. मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही, त्यामुळे मासिक पाळी दरम्यान, पगारी सुट्टी देण्याच्या धोरणाची हमी देता येणार नाही असे वक्तव्य इराणी यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.