For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नव्या निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला अंतरिम स्थगिती नाही

06:42 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
नव्या निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला अंतरिम स्थगिती नाही
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

केंद्र सरकारच्या निवड समितीने नुकत्याच केलेल्या नव्या निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे नव्या आयुक्तांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या विषयावर 21 मार्चला सुनावणी करण्याचा निर्णयही न्यायालयाने घेतला आहे.

न्या. संजीव खन्ना, न्या. दीपांकर दत्ता, आणि न्या. ऑगस्टिन जॉर्ज यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी शुक्रवारी झाली. नव्या दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केंद्र सरकारच्या समितीने 2023 च्या कायद्यानुसार केल्या आहेत. हा कायदा संसदेने संमत केला आहे. सहसा सर्वोच्च न्यायालय कोणत्याही कायद्याला अंतरिम स्थगिती देत नाही. त्यामुळे नव्या आयुक्तांच्या नियुक्तीलाही अंतरिम स्थगिती दिली जाणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

Advertisement

पूर्वीची व्यवस्था

पूर्वीच्या व्यवस्थेनुसार निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी स्थापन करण्यात आलेल्या 3 सदस्यांच्या समितीत सरन्यायाधीशांचाही समावेश होता. तथापि, नव्या कायद्यानुसार त्यांच्या स्थानी केंद्रीय मंत्र्याला समितीचे सदस्यत्व देण्यात आले आहे. नव्या दोन आयुक्तांची नियुक्ती या नव्या कायद्यानुसार स्थापन झालेल्या समितीने केली आहे. या समितीत सरन्यायाधीशांना स्थान देण्यात न आल्याच्या विरोधातही एक याचिका सादर करण्यात आली असून या याचिकेवरही 21 मार्चलाच सुनावणी केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती न दिल्याने दोन्ही नवे निवडणूक आयुक्त त्यांचे कार्य विनाअडथळा करत राहणार आहेत.

Advertisement
Tags :

.