For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंतहीन युद्ध नाही : नेतान्याहू

06:25 AM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
अंतहीन युद्ध नाही   नेतान्याहू
Advertisement

इराणविरोधात निर्णायक कारवाई होणार

Advertisement

इराण स्वत:च्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतर बिथरला आहे. इस्रायलसोबत आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांवर इराण सातत्याने हल्ले करत आहेत. प्रारंभिक 30 तासांमध्ये इस्रायल आणि अमेरिकेने 2 हजारांहून अधिक बॉम्ब टाकले आहेत. याचबरोबर एक हजाराहून अधिक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. तर इराणमधील बळींचा आकडा 742 वर पोहोचला आहे. याचदरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी इराण विरोधी युद्धावरून मोठी घोषणा केली आहे.

इराणविरोधी सैन्य कारवाई त्वरित आणि निर्णाय असेल आणि याला अनेक वर्षांपर्यंत चालणाऱ्या युद्धात बदलण्याची कुठलीच योजना नाही असे नेतान्याहू यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे. वर्तमान सैन्य संघर्षाला इस्रायल अंतहीन संघर्षात बदलू इच्छित नाही. हे अभियान क्षेत्रीय स्थिरता आणि शांततेच्या दिशेने एक मार्ग खुला करू शकते असे उद्गार त्यांनी काढले आहेत.

Advertisement

हे काही अंतहीन युद्ध नाही, तर क्षेत्रात स्थायी शांततेच्या दिशेने एक पाऊल आहे. वर्तमान संघर्ष या क्षेत्राच्या देशांसोबत इस्रायलच्या संबंधांना सामान्य करणारा आणि अधिक करारांचा मार्ग प्रशस्त करू शकतो असा दावा नेतान्याहू यांनी केला.

इराणसंबंधी भूमिका

इस्रायल इराणसोबत दीर्घ युद्धात गुंतून पडू इच्छित नाही. सत्तापरिवर्तनाची अंतिम जबाबदारी इराणच्या जनतेची आहे, परंतु अमेरिका आणि इस्रायल मिळून अशी परिस्थिती निर्माण करत आहेत, ज्याच्या माध्यमातून तेथील लोक स्वत:च्या भविष्यावरून निर्णय घेऊ शकतील. वर्तमान सैन्य अभियान मर्यादित काळापर्यत चालेल आणि याला दीर्घ कालावधीच्या प्रक्रियेत बदलण्याची योजना नसल्याचे उद्गार नेतान्याहू यांनी काढले आहेत.

अमेरिकेच्या उपाध्यक्षांचे वक्तव्य

ट्रम्प हे स्वत:च्या ‘अंतहीन युद्धांपासून वाचण्या’च्या आश्वासनापासून मागे हटत असल्याचा केला जाणारा आरोप अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांनी फेटाळला आहे. इराणवर कारवाई इराक आणि अफगाणिस्तानच्या युद्धांपेक्षा वेगळी आहे, कारण याचा उद्देश स्पष्ट स्वरुपात निश्चित करण्यात आला आहे. अध्यक्ष ट्रम्प हे कुठल्याही लक्ष्याशिवाय अनेक वर्षांपर्यंत चालणाऱ्या युद्धात अमेरिकेला लोटणार नाहीत. इराणने अण्वस्त्रs प्राप्त करू नयेत हा या कारवाईचा मुख्य उद्देश असल्याचा दावा वेन्स यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.