For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युद्धाचा कोणताच स्पष्ट उद्देश नाही!

11:48 PM Mar 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
युद्धाचा कोणताच स्पष्ट उद्देश नाही
Advertisement

अमेरिकेच्या माजी एनएसएकडून चिंता व्यक्त : ट्रम्प यांच्या रणनीतिवर टीकास्त्र

Advertisement

पश्चिम आशियाती संघर्ष कमी होण्याऐवजी भयावह रुप धारण करत आहे. याचदरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) जॅक सुलिवन यांनी ट्रम्प प्रशासनाच्या इराणसोबतच्या युद्धावरून चिंता व्यक्त केली. तसेच त्यांनी ट्रम्प यांच्या इराणसोबतच्या युद्धनीतीवरून टीकाही केली आहे.  अमेरिकन सैन्य अभियान सामरिक स्तरावर यशस्वी होताना दिसत असले तरीही युद्ध एक स्पष्ट रणनीतिक उद्देशाशिवाय भटकू शकते, असे सुलिवन यांचे सांगणे आहे.

अमेरिकेचे सैन्य अत्यंत कुशल, साहसी अन् प्रोफेशनल आहे, परंतु युद्धाचा अंतिम उद्देश अद्यापही स्पष्ट नाही. युद्ध अमेरिकेच्या सैनिकांसाठी धोका निर्माण करत असून आतापर्यंत 7 सैनिकांनी जीव गमावला आहे. प्रशासनाने युद्धासाठी अनेक वेगवेगळी कारणे सांगितली आहेत, परंतु कुठलीच स्पष्ट रणनीति नाही आणि ती काळासोबत बदलत राहत असल्याचा दावा सुलिवन यांनी केला आहे.

Advertisement

रणनीतिचा अभाव अन् मोठ्या जोखिमीची शक्यता

युद्धाच्या प्रारंभिक एक आठवड्यापेक्षा अधिक काळ उलटूनही अस्पष्ट रणनीति एक गंभीर जोखीम आहे. ट्रम्प प्रशासनाने व्हेनेझुएलात पूर्वीच्या कारवाईपासून चुकीचा धडा घेतला आहे. अमेरिका कुठेही, कुठल्याही वेळी सैन्यबळाचा वापर करू शकतो असा संदेश यामुळे जाऊ शकतो असे सुलिवन यांचे सांगणे आहे.

भूराजकीय धोका अन् रशियाला लाभ

या युद्धाचे अनपेक्षित भू-राजकीय परिणाम होऊ शकतात, ज्यामुळे खासकरुन रशियाला फायदा होणार आहे. रशिया अमेरिकन सैनिकांच्या तळांची माहिती प्राप्त करत इराणला मदत करू शकतो अशी भीती सुलिवन यांनी व्यक्त केली.

युक्रेन अन् चीनवरील प्रभाव

पश्चिम आशियात युद्ध सुरू करण्याचा निर्णय युक्रेनसाठी अमेरिकेच्या समर्थनाला कमकुवत करू शकतो. हे युद्ध भू-राजकारणात धोकादायक उदाहरण ठरू शकते आणि चीन तैवानवर सैन्य कारवाई करण्याची स्वत:ची क्षमता वाढल्याचा विचार करू शकतो. युद्ध कुठल्याही स्पष्ट रणनीतिशिवाय जारी राहिल्याने अमेरिकन सैनिक धोक्यात येण्यासोबत जगभरातील मोठ्या देशांसाठी चुकीचा संदेश देणारे ठरू शकते असा निष्कर्ष सुलिवन यांनी काढला आहे.

Advertisement

.