महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

असेही असते भाग्य

06:02 AM Feb 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोणाचे भाग्य कधी आणि कोणत्या कारणाने फळफळेल हे सांगता येणे अशक्यच आहे. अमेरिकेतील व्हर्जिनियात वास्तव्य करणाऱ्या एका सामान्य ट्रक चालकाच्या संदर्भात जो प्रकार घडला, तो वाचून थक्क झाल्याशिवाय दुसरी काही प्रतिक्रिया उमटू शकतच नाही. जॅव्हरी क्लेमेंटस् असे या चालकाचे नाव आहे. त्याची एक डिलिव्हरी व्हॅन आहे. एका घटनेने तो एका दिवसात करोडपती झाला.

Advertisement

तर त्याचे असे झाले की, तो काही दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे आपली व्हॅन चालवित निघाला होता. काही माल त्याला एका स्थानाहून दुसऱ्या स्थानी पोहचवायचा होता. एका ठिकाणी तो थांबला असता त्याला तेथे लॉटरी तिकिटांची विक्री करणारा स्टॉल दिसला. त्याने सहज म्हणून एक तिकिट विकत घेतले. पण ते ‘लागेल’ असे काही त्याला वाटले नाही. म्हणून त्याने ते कोठेतील फेकून दिले. नंतर तो तिकिटाची बाब विसरुनही गेला. काही काळानंतर आपल्या व्हॅनची साफसफाई करताना त्याला मागच्या सीटवर एक कपटा पडलेला दिसला. कोणता कागद आहे, हे त्याने पाहिले असता त्याने फेकलेले लॉटरी तिकिट त्याला आढळले. ते लॉटरी किकिट त्याच्या सुदैवाने लागले आणि त्याला तब्बल एक कोटी रुपये मिळाले. मधल्या काळात त्याच्या व्हॅनमधून काही लोकांनी प्रवासही केला होता. तथापि, कोणाचेही लक्ष त्या तिकिटाकडे गेले नव्हते.

Advertisement

अखेर ते तिकिट त्याचे त्यालाच सापडले आणि त्याचे भाग्यच फळफळले. त्या फेकून दिलेल्या आणि नंतर विस्मरणात गेलेल्या लॉटरी तिकिटाने त्याचे भाग्य फळफळले आहे. त्याने फेकलेले ते तिकिट अन्य कोणाच्या हाती लागले असते आणि त्या व्यक्तीने ते त्याच्याकडे दिले नसते, तर त्याला हा लाभ झाला नसता. पण अखेरीस ती रक्कम त्याच्याच भाळी लिहिलेली होती, हेच खरे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्याने हा प्रकार सोशल मिडियावर प्रसारित केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article