For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता

10:59 AM Apr 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता
Advertisement

राज्यात दुष्काळाची भीती : एप्रिल ते जून कालावधीत उष्णतेच्या लाटेचा इशारा, सहा जिल्ह्यांमध्ये पावसाची कमतरता

Advertisement

बेंगळूर : एकीकडे जूनपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे उन्हाळी हंगामातील पेरणीही कमी झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी कर्नाटकात पावसाच्या प्रमाणात घट होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळाची भीती निर्माण झाली आहे. एप्रिल ते जून या कालावधीत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

विशेषत: उत्तर कर्नाटक जिल्ह्यामध्ये नेहमीपेक्षा अधिक उष्णतेच्या लाटा जाणवण्याची शक्मयता आहे. बेळगाव, विजापूर, बागलकोट, बिदर, कलबुर्गी, रायचूर, यादगिरी, गदग, कोप्पळ, विजयनगर, या जिल्ह्यांमध्ये जूनपर्यंत उष्णतेची तीव्र लाट राहण्याची शक्मयता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तर किनारपट्टी, मलनाड आणि दक्षिण अंतर्गत भागातील जिल्ह्यांमध्ये नेहमीपेक्षा कमी उष्णतेच्या लाटा असू शकतात. मात्र दक्षिण अंतर्गत भागातील काही ठिकाणी तापमान जास्त राहण्याची शक्मयता आहे.

Advertisement

पेरणीमध्ये घट

पावसाचा अभाव आणि वाढत्या उष्णतेमुळे राज्यात मार्च अखेरपर्यंत उन्हाळी हंगामातील पेरणीचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. कृषी विभागाच्या माहितीनुसार पेरणीमध्ये घट झाली आहे. उन्हाळी हंगामासाठी राज्यात 6.40 लाख हेक्टर पेरणीचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. परंतु मार्च अखेरपर्यंत प्रत्यक्षात 4.54 लाख हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. म्हणजेच केवळ 71 टक्के पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी खात्याच्या आकडेवारीवरून मिळाली आहे. गेल्या 5 वर्षांतील सरासरी पेरणी क्षेत्र 4.72 लाख हेक्टर होते. गेल्यावषी म्हणजे 2025 मध्ये 31 मार्चपर्यंत 5.74 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा लक्ष्यापेक्षा 1.86 लाख हेक्टर क्षेत्र कमी पेरले गेले आहे. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.2 लाख हेक्टरने पेरणी कमी झाली आहे.

पूर्वमान्सूनची स्थिती

1 मार्च ते 15 एप्रिलदरम्यान बेळगाव, धारवाड, कारवार, शिमोगा, कलबुर्गी, हावेरी, गदग, बेंगळूर ग्रामीण, दावणगेरे आणि उडुपी या 10 जिल्ह्यांमध्ये अधिक पाऊस झाला आहे. तर विजयनगर, तुमकूर, बळ्ळारी, विजापूर, चित्रदुर्ग, बेंगळूर शहर, बेंगळूर दक्षिण, मंगळूर, हासन आणि कोलार या 10 जिल्ह्यांमध्ये नेहमी इतकाच पाऊस झाला आहे. मंड्या (21 टक्के), चामराजनगर (21 टक्के), कोडगू (33 टक्के), रायचूर (34 टक्के), म्हैसूर (46 टक्के) आणि यादगिरी (48 टक्के) या 6 जिल्ह्यांमध्ये पावसाची कमतरता दिसून आली आहे. तसेच बागलकोट, बिदर, चिक्कमंगळूर, कोप्पळ आणि चिक्कबळ्ळापूर या 5 जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस झाला आहे, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

पाच दिवस मुसळधार पावसाची शक्मयता

राज्यभरात उकाड्याची तीव्रता वाढत असून त्यामुळे लोकांचे जीवन कठीण होत आहे. पुढील पाच दिवस राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्मयता वर्तवण्यात आली आहे. 21 ते 24 एप्रिल दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्मयता आहे. बेळगाव, धारवाड, हावेरी, गदग, कलबुर्गी, यादगीर आणि रायचूर जिल्ह्यांच्या उत्तरेकडील अंतर्गत भागांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.

Advertisement
Tags :

.