For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur weather update : कोल्हापूरात थंडी पुन्हा वाढण्याची शक्यताच; हवामानतज्ज्ञांचा अंदाज

05:23 PM Jan 06, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur weather update   कोल्हापूरात थंडी पुन्हा वाढण्याची शक्यताच  हवामानतज्ज्ञांचा अंदाज
Advertisement

                            कोल्हापुरात पुन्हा थंडी वाढणार,

Advertisement

कोल्हापूर: वर्ष अखेरीपर्यंत असलेली बंडी हवामानबदलामुळे कमी झाली आहे. मात्र आता पुन्हा हवापालट होण्याची चिन्हे असून उत्तरेकडून वेणाऱ्या वाऱ्यांमुळे ९ ते १५ जानेवारी या कालावधीत तापमान घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे. उत्तरेकडून कडून येणारे थंड वारे निरभ्र आकाश आणि कोरडे हवामान यामुळे यंदा शहरासह जिल्ह्यात डिसेंबरमध्ये चंही अनुभवायत्ता मिळाली.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर भारतातील बंड हवेचे प्रवाह हळूहळू मध्य आणि पश्चिम भारताकडे सरकत आहेत. या थंड वाऱ्यांचा परिणाम राज्यातील अनेक भागांवर होणार असून, शहरासह जिल्ह्यात सकाळ व रात्रीच्या तापमानात घट जाणवण्याची शक्यता आहे. विशेषतः पहाटेच्या वेळी गारठा वाढणार असून, यंदा डिसेंबर महिन्यात उत्तरेकडून येणारे चंड वारे, निरभ्र आकाश आणि कोरडे हवामान यामुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात थंडीचा अनुभव नागरिकांना घेता आला.

Advertisement

मात्र गेल्या काही दिवसांपासून तापमानात बोही वाढ झाली होती. आता पुन्हा एकदा थंही जोर धरत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही हा हवामान बदल महत्त्वाचा ठरणार आहे.

Advertisement
Tags :

.