For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

येथे वेगळ्याच पद्धतीने होतोय प्रचार

04:53 AM Nov 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
येथे वेगळ्याच पद्धतीने होतोय प्रचार
Advertisement

तेलंगणाच्या महाराष्ट्राला लागून असलेल्या भागात, विधानसभा निवडणुकीचा प्रचार राज्यातील इतर भागांपेक्षा वेगळ्याच प्रकारे होताना दिसून येतो आहे. येथे राज्याच्या तेलगु भाषेत प्रचारपत्रके न काढली जाता ती हिंदी भाषेतून काढली जात आहेत. कारण या भागात मराठी बोलणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. भित्तीपत्रकेही हिंदीतून आणि काही मराठीतूनही आहेत. सर्व पक्षांचे उमेदवार मतदारांशी संपर्क साधताना हिंदी भाषेचा आवर्जून उपयोग करताना दिसून येतात, अशी माहिती जमिनीवर निरीक्षण करणाऱ्या अनेक पत्रकारांकडून मिळत आहे.

Advertisement

महाराष्ट्राच्या सीमेवर या राज्याचा निर्मल हा जिल्हा प्रामुख्याने आहे. येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची काँग्रेससाठी प्रचारसभा दोन दिवसांपूर्वी झाली. त्यांनी हिंदीतून भाषण करुन मतदारांना काँग्रेसला निवडणूक आणण्याचे आवाहन केले. त्यांच्याप्रमाणेच भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेतेही या भागात प्रचार करीत आहेत. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि भारत राष्ट्र समिती हे तीनही पक्ष मतदारांना हिंदी आणि मराठीतून आपला वचननामा समजावून सांगताना दिसून येतात. बंजारा भाषेचा उपयोगही केला जातो.

Advertisement
Advertisement
Tags :

.