For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाळूचेही असतात झरे

06:44 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
वाळूचेही असतात झरे
Advertisement

पाण्याचे झरे असतात याची आपल्या सर्वांना माहिती आहे. अनेकदा आपण असे झरे पाहिलेले असतात. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये असे झरे अनेक ठिकाणी पहावयास मिळतात. उंचवटच्या स्थानांवरुन पाणी जेव्हा झिरपून बाहेर पडले आणि खाली सांडू लागते, तेव्हा झरा उत्पन्न होतो. असे झरे विहीरींमध्ये असतात. त्यामुळे विहिरींमध्ये पाण्याचा साठा होतो. पाणी द्रवस्वरुपी असते त्यामुळे ते झऱ्याच्या रुपात ते पाझरते. तथापि, वाळूचेही झरे असतात आणि ते पाण्याच्या झऱ्यासारखेच दिसतात, ही माहिती आपल्यासाठी आश्चर्यकारक असू शकते.

Advertisement

सहारा, कलहारी किंवा अन्य कोणत्याही मोठ्या वाळवंटांमध्ये असे वाळूचे झरे असतात. जोराच्या वाऱ्यामुळे वाळवंटात वाळूचे मोठे डोंगर किंवा ढीग निर्माण होतात. काहीवेळा या डोंगरांचा आकार एका बाजूने सपाट असणाऱ्या कड्यांसारखा होतो. या कड्यांवरुन वाळू निसटून पडताना ती पाण्याच्या झऱ्याप्रमाणे दिसते. लांबून पाहणाऱ्याला तर ती वाळू आहे हे समजू शकत नाही, इतके तिचे पाण्याच्या झऱ्याशी साधर्म्य दिसून येते. अर्थात हा दृक्भ्रम किंवा आभास असतो.

वाळवंटात काही स्थानी घट्ट भूमीही असते. अशा घट्ट जमीनीच्या कड्यांमध्ये असलेल्या भेगांमधून जेव्हा सुटी वाळू बाहेर येऊन खाली पडते, तेव्हा ते दृष्यही वाळूच्या झऱ्याप्रमाणेच दिसते. हे दृष्य नयनमनोहर असते, असे अनेक पर्यटकांचे मत आहे. अर्थातच असे झरे पाहण्यासाठी वाळवंटातच जावे लागते.

Advertisement

Advertisement
Tags :

.