For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तर सिगरेट नाही मिळणार

04:22 AM Apr 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
तर सिगरेट नाही मिळणार
Advertisement

मानवाच्या आरोग्यासाठी घातक असणाऱ्या वस्तूंमध्ये सिगरेटचे स्थान खूपच वरचे आहे. अतीधूम्रपानामुळे फुप्फुसांचा कर्करोग होण्याची, तसेच श्वसनसंस्थेचे इतर अनेक विकार होण्याची शक्यता असते. प्रत्येक वर्षी धूम्रपानामुळे मोठ्या प्रमाणात अवकाळी मृत्यू होतात. हे दुष्परिणाम लक्षात घेऊन युरोप खंडात सिगरेटविरुद्ध मोठ्या प्रमाणात जनमत निर्माण करण्यात येत आहे. हे जनमत निर्माण करण्यासाठी समाजप्रबोधन, व्यक्तीगत समुपदेशन आदी मार्गांचा अवलंब तर केला जात आहेच. त्याखेरीज, कठोर कायदे करुनही सिगरेटवर मात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नुकताच ब्रिटनमध्ये असा एक कठोर कायदा संमत झाला आहे.

Advertisement

या कायद्यानुसार ज्या व्यक्तींचा जन्म 2008 या वर्षानंतर झाला आहे, त्यांना कधीही सिगरेट मिळणार नाही. 1 जानेवारी 2008 या दिवसासह पुढे कोणत्याही दिवशी जन्माला आलेल्या कोणालाही सिगरेट विकत घेता येणार नाही, किंवा धूम्रपान करता येणार नाही. अर्थातच, या कायद्याचे काटेकोर कार्यान्वयन करणे, हे ब्रिटनच्या प्रशासनासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. कारण, वैधरित्या सिगरेट विकत घेणे किंवा ती ओढणे शक्य होत नसेल, तर बेकायदेशीर मार्गाने ती विकत घेण्याचा आणि कोणाला दिसणार नाही, अशा स्थानी जाऊन ती पिण्याचा प्रयत्न केला जाणार, हे निश्चित आहे. तथापि, अशा प्रकारचा कायदा करणारा ब्रिटन हा प्रथम देश ठरला आहे. ब्रिटनच्या प्रशासनाने असेही निर्धारित केले आहे, की, प्रत्येक वर्षी हा कालावधी एक वर्षाने वाढविण्यात येईल. याचाच अर्थ असा, की 1 जानेवारी 2008 या दिवसासह नंतरच्या कोणत्याही दिवशी जन्माला आलेल्या कोणत्याही व्यक्तीला आयुष्यात कधीही सिगरेट खरेदी करता येणार नाही, किंवा अधिकृतरित्या ती कोठीही ओढता येणार नाही. अशा प्रकारे, सिगरेटच्या सेवनाला आळा घालण्याचा प्रयत्न ब्रिटनच्या प्रशासनाकडून केला जाताना दिसून येत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.