For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur | ...तर टोल रद्दची गडकरींना मागणी करणार : मंत्री हसन मुश्रीफ

12:34 PM Nov 04, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur      तर टोल रद्दची गडकरींना मागणी करणार   मंत्री हसन मुश्रीफ
Advertisement

                                मंत्री हसन मुश्रीफ गडकरींना भेटणार

Advertisement

कोल्हापूर : पुणे ते कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे, जे काम सुरु आहे ते वेळेत आणि पूर्ण दर्जेदार करावे. जर रस्त्यांची कामे येत्या ३१ जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण आणि दर्जेदार झाली नाहीत तर पुणे कोल्हापूर महामार्गावरील टोलनाके रद्द करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मनपा प्रशासक के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकयन. एस., संजय घाटगे, राधानगरीचे प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, नॅशनल हायवे ऑफ अथॉ रिटीचे प्रकल्प संचालक संजय कदम, भैया माने उपस्थित होते.

Advertisement

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असल्याने सातारा-कागल महामार्गावरील रस्त्यांची चाळण झाली आहे. तसेच सेवा रस्ते पूर्णतः खराब झाले आहेत. यांची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी, जेणेकरुन प्रवाशांचा प्रवास सुखकारक होईल.

गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव हे गाव १०० टक्के सोलरयुक्त करण्यात यावे. यासाठी लागणारे उर्वरित तीन कोटी रुपये सीएसआर मधून जमा करण्यात यावेत. तसेच कोल्हापूर महानगरपालिकेचे जे गाळेधारक भाडेकरु आहेत त्यांनी भाड्यापोटी मूळ रक्कम अदा करावी.

मनपाने त्यांच्याकडून व्याज आकारणी करु नये, अशी सूचनाही त्यांनी केली. मौजे बेलेवाडी मासा येथील महार वतन जमीन संपादन, गडहिंग्लज बडरगे रोड येथे नव्याने विकसित होणारे क्रीडा संकुलाच्या हद्दीतील वृक्षतोड, आंबे ओहोळ मध्यम प्रकल्प पुनर्वसनबाबत प्रलंबित विषय, पदवीधर मतदार नोंदणी तसेच कोल्हापूर महानगरपालिकेतील भाडेवाढ संदर्भात किरकोळ किराणा दुकानदार व्यापाऱ्याऱ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने आढावा घेतला.

या आढावा बैठकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, निवडणूक उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, गडहिंग्लज तहसीलदार ऋषिकेश शेळके, गटविकास अधिकारी देवानंद ढेकळे, शिवराज नाईकवाडे, वनविभागाचे धैर्यशील सावंत यांच्यासह संबंधित अधिकारी पाटील, विलास काळे, सचिन उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.