कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

...तर असा विकास आम्हाला नको

11:05 AM Aug 05, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

लांजा :

Advertisement

लांजा नगरपंचायतीच्या प्रारुप शहर विकास आराखड्यावर दाखल झालेल्या एकूण 1500 हरकतींवर सोमवारी सुनावणीस सुऊवात झाली. पहिल्या दिवशी सुनावणीकरिता 340 हरकतींचा समावेश करण्यात आला. सायंकाळी उशिरापर्यंत ही सुनावणी सुरु होती. विकासाच्या नावाखाली आमच्या वडिलोपार्जित जमिनी, घरे उद्ध्वस्त होणार असतील तर असा विकास आम्हाला नको अशी स्पष्ट भूमिका यावेळी नागरिकांनी मांडली.

Advertisement

विकास आराखड्यास तातडीने स्थगिती मिळावी, या मागणीसाठी लांजा-कुवे येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लांजा-कुवे बचाव समितीच्या वतीने त्रिसदस्यीय तज्ञ समितीकडे याबाबत निवेदन सादर करण्यात आले. सुनावणीसाठी नेमण्यात आलेल्या तज्ञ त्रिसदस्यीय समितीत नगररचना विभागाचे सेवानिवृत्त सहाय्यक संचालक मिलिंद आवडे, सेवानिवृत्त नगररचनाकार शिवप्रसाद धुपकर आणि चंद्रशेखर तायशेटे यांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी 9 मीटर रस्त्याच्या 72 हरकती तसेच 12, 15, 18 व 24 मीटर रस्त्यांच्या 116 हरकती, ग्रीन झोनवरील 111 आणि वैयक्तिक स्वऊपातील 41 हरकती असा 340 हरकतींचा समावेश सुनावणीकरिता करण्यात आला होता.

सुनावणीदरम्यान नागरिकांनी आपली मते मांडताना विकासाच्या नावाखाली आमच्या वडिलोपार्जित जमिनी, घरे उद्ध्वस्त होणार असतील तर असा विकास आम्हाला नको अशी स्पष्ट भूमिका घेतली. यावेळी लांजातील वकिलांनी देखील युक्तिवाद केला. विकास आराखड्यात ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कसबा भागाचा विचार न केल्याबद्दल नाराजी व्यक्त झाली. तसेच आराखडा फक्त भूमी अभिलेख कार्यालयाच्या माहितीद्वारे तयार केल्यामुळे अनेक त्रुटी निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. गटबुक नकाशे उपलब्ध नसल्यामुळे नागरिक संभ्रमात आहेत, असा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.

संबंधित कंपनीने प्रत्यक्ष जागेची पाहणी न करता कार्यालयात बसून आराखडा तयार केल्यामुळे यामध्ये गंभीर त्रुटी आहेत. शेकडो घरे, गोठे बाधित होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला. दरम्यान, त्रिसदस्यीय तज्ञ अधिकाऱ्यांनी नागरिकांना आश्वस्त करताना सांगितले की, आपल्या भावना आम्ही समजून घेतल्या असून त्या प्रशासनापर्यंत पोहचवण्याची आमची जबाबदारी आहे. आम्ही तुमच्या अडचणी योग्य पद्धतीने सादर करू.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article