For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

...तर पानमसाला, गुटखा विक्रीवर राज्यात बंदी

06:23 AM Jun 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
   तर पानमसाला  गुटखा विक्रीवर राज्यात बंदी
Advertisement

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा इशारा

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेंगळूर

Advertisement

कर्नाटकात सर्व प्रकारच्या पान मसाला आणि गुटख्यामध्ये अल्प प्रमाणात अमली पदार्थ मिसळलेले आढळून आल्यास त्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात येईल, असा कडक इशारा मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिला आहे. रविवारी बेंगळूर येथील कंठिरवा स्टेडियममध्ये आयोजित राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 31 वा स्थापना दिन आणि ‘नशामुक्त भारत’ अभियान कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्री शिवकुमार पुढे म्हणाले, पान मसाला, गुटखा, सुपारी आणि इतर पदार्थांमध्ये अमली पदार्थ मिसळून त्यांची विक्री केली जात असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. जर हे खरे असेल तर हे तात्काळ थांबवावे. अन्यथा कर्नाटकात सर्व प्रकारच्या पान मसाला आणि गुटख्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

अमली पदार्थमुक्त कर्नाटक निर्माण करण्याचे ध्येय

अमली पदार्थमुक्त कर्नाटक निर्माण करणे आमचे ध्येय आहे. त्यासाठी आम्ही एक कार्यक्रम आयोजित करत आहोत. आज ‘अमली पदार्थमुक्त भारत मेळावा’ आयोजित करण्यासाठी तुम्ही सर्वजण एकत्र आला आहात, याचे मी स्वागत करतो. अमली पदार्थांच्या व्यसनाला प्रतिबंध करणे हे एक मोठे आव्हान आहे. चला आपण सर्व एकत्र येऊया आणि तऊण पिढीला या व्यसनाच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवूया. हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तुम्ही जीव वाचवण्याचा व्यवसाय निवडला आहे, मी तुमचे अभिनंदन करतो, असेही मुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले.

Advertisement
Tags :

.