महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

... तर रेशनकार्डे रद्द होणार

10:34 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नागरी पुरवठा खात्याचा इशारा : आधारकार्ड लिंक करण्याची सूचना

Advertisement

पणजी : राज्यातील ज्या नागरिकांनी रेशनकार्डे आधारकार्डशी लिंक केलेली नाहीत, अशांनी आपली आधारकार्डे येत्या 22 डिसेंबरपर्यंत नागरी पुरवठा खात्याच्या आपल्या तालुक्यातील कार्यालयात जमा करावीत. जे नागरिक याची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांची रेशनकार्डे तात्पुरती रद्द केली जातील, असा इशारा नागरी पुरवठा खात्याने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून दिला आहे. केंद्र सरकारने कोविड काळात नागरिकांना मोफत धान्य पुरवले होते. यापुढेही डिसेंबर 2023 पर्यंत मोफत धान्य मिळणार आहे. परंतु सरकारच्या या योजनेचा अनेकजण चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत. अनेकांची दोन रेशनकार्डे असून, दोन्ही रेशनकार्डामध्ये नावे असलेले अनेक लाभार्थी आहेत. अशा अपात्र लाभार्थीना लगाम लावण्यासाठी केंद्रीय नागरी पुरवठा मंत्रालयाने 19 मार्च 2020 रोजी आदेश जारी करत, देशभरातील रेशनकार्ड धारकांना रेशनकार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्याची सक्ती केली होती. परंतु, तीन वर्षांत अनेकांनी ही प्रक्रिया न केल्यामुळे वारंवार मुदतवाढ दिली होती. आता या प्रक्रियेस 31 डिसेंबर 2023 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article