कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

...तर पॅनकार्ड होऊ शकेल निरुपयोगी

06:28 AM Nov 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

1 जानेवारी 2026 च्या आत आधारजोडणी करा

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

आपला ‘पर्मनंट अकाऊंट नंबर’ किंवा पॅनकार्ड या वर्षांच्या अखेरीपर्यंत निरुपयोगी किंवा डीअॅक्टिव्हेट होऊ शकेल, असा इशारा देण्यात आला आहे. आपण या कालावधीत आपला पॅनकार्ड आधार कार्डाशी जोडले नाही, तर ते डीअॅक्टिव्हेट होऊ शकते. हा नियम केंद्र सरकारच्या प्रत्यक्ष कर विभागाने केला असून त्याचे उल्लंघन केल्यास हा परिणाम होऊ शकतो, असे स्पष्ट केले गेले.

आपले पॅनकार्ड निरुपयोगी ठरल्यास आपल्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. आपल्याला बँक खाते किंवा डीमॅट खाते उघडता येणार नाही. तसेच असलेल्या खात्यांमध्ये 50 हजार रुपयांच्या वरची रक्कम जमा करता येणार नाही किंवा या रकमेपेक्षा अधिकच्या ठेवी ठेवता येणार नाहीत. डीमॅट अकाऊंट काढण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे. ते कार्यरत नसेल तर आपण शेअरबाजारात गुंतवणूक करु शकणार नाही. त्याचप्रमाणे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट योजनेतही (एसआयपी) गुंतवणूक करु शकणार नाही. तसेच सरकारी अनुदाने, कल्याणकारी योजना आणि इतर आर्थिक लाभांसाठी आपण अर्ज करु शकणार नाही. आपल्या बँकांकडून किंवा तत्सम अन्य वित्तसंस्थांकडून कर्ज हवे असल्यास त्यासाठी आपण अर्ज करु शकणार नाही. विदेशी चलनाचे रुपये 50 हजारांच्या पुढचे व्यवहार आपण करु शकणार नाही. इतकेच नव्हे, तर आपण आपला व्यवसायही करु शकणार नाही. कारण व्यवसाय करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. सरकारी कार्यालयांमध्येही आपली अडचण होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

पॅन आधारशी लिंक कसे करावे ?

आपण अत्यंत सोप्या पद्धनीने आपले पॅन कार्ड आधार कार्डाशी जोडू शकता. त्यासाठी पुढील कृती आपल्याला करावी लागणार आहे. ही सोपी कृती असून तुम्ही कोणाच्याही साहाय्याशिवायही ती करुन तुमचा पॅन आधारशी जोडू शकता, असे प्रत्यक्ष कर विभागाने स्पष्ट केले आहे. पुढील पायऱ्या कराव्या लागतील.

1.प्ttज्s://www.ग्हम्दर्से.gदन्.ग्ह/गम्/िदज्दूत्. ही बेबसाईट उघडा. ही प्राप्तीकर ईफायलिंगची वेबसाईट आहे.

  1. त्यातील लिंक आधार या टॅबर क्लिक करा, हा टॅब डाव्या पॅनेलवर आहे.
  2. आपला पॅन आणि आधार क्रमांक एंटर करा आणि ‘व्हेलिडेट’ क्लिक करा.
  3. आपले आधार आणि पॅन यायूर्वीच जोडले गेले असेल तर पॉप अप संदेश आपल्याला येईल. जोडलेले नसेल तर आपल्याला आपला मोबाईल क्रमांक विचारला जाईल आणि या मोबाईलवर ओटीपी येईल. हा ओटीपी एंटर करा.
  4. अशा प्रकारे आपले पॅन कार्ड आधार कार्डाशी जोडले जाईल.
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article