For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

...तर आयएएस शुभम गुप्ताही सह आरोपी

04:59 PM Jul 09, 2025 IST | Radhika Patil
   तर आयएएस शुभम गुप्ताही सह आरोपी
Advertisement

मुंबई :

Advertisement

सांगलीतील २४ मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी मागवलेल्या सात लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अटकेत असलेल्या उपायुक्त वैभव साबळे यांच्यासोबतच ही लाच ज्यांच्यासाठी मागितली गेली, त्या तत्कालीन आयुक्त व IAS अधिकारी शुभम गुप्ता यांचाही सहभाग असल्यास त्यांनाही सहआरोपी करण्यात येईल, अशी स्पष्ट घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत केली. हा मुद्दा आमदार सदाभाऊ खोत यांनी सभागृहात उपस्थित केला होता.

वैभव साबळे यांना अँटी करप्शनने रंगेहाथ पकडले असताना त्यांनी चौकशीदरम्यान असे सांगितले की, "शुभम गुप्ता यांच्या वतीने लाच मागत आहे." हे वक्तव्य गुन्हेगारी स्वरूपाचे मानले जात असून, लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील नव्या तरतुदीनुसार, संबंधित अधिकाऱ्यालाही दोषी ठरवता येते. या प्रकरणात तक्रारदारांनी यापूर्वीच शुभम गुप्ता यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

Advertisement

आ. खोत यांनी यावेळी सांगलीतील विज बिल घोटाळ्याचा संदर्भ देत सांगितले की, या प्रकरणाच्या S.I.T. चौकशीची जबाबदारी देखील वैभव साबळे यांच्याकडे होती आणि आता ते स्वतःच लाच प्रकरणात अटकेत आहेत. त्यामुळे शुभम गुप्ता यांच्यावरही गुन्हा दाखल करून चौकशीच्या कक्षेत आणले पाहिजे, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.

याच चर्चेत आमदार परिणय फुके आणि प्रसाद लाड यांनीही सहभाग घेतला. यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री भोयर म्हणाले, "या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चौकशीत शुभम गुप्ता दोषी आढळल्यास त्यांच्यावरही निश्चितच कारवाई केली जाईल."

Advertisement
Tags :

.