मृत्यूनंतरही सुटली नाही साथ
इतिहासाच्या पानांमध्ये अनेकदा राजे आणि युद्धांच्या कहाण्या मिळतात, परंतु कधीकधी जमिनीत दडलेल्या मानवीय कहाण्या अचानक समोर येत असतात. ब्रिटनच्या चेरिंग्टनमध्ये कोट्सवोल्ड आर्कियोलॉजीच्या पुरातत्वतज्ञांना उत्खननादरम्यान एक असामान्य अँग्लो-सॅक्सन थडगे मिळाले आहे. 1500 वर्षे जुन्या या थडग्याने वैज्ञानिकांना स्तब्ध केले आहे. या थडग्यात एक छोटा मुलगा आणि मुलीचे अवशेष आजूबाजूला दफन अवस्थेत मिळाले आहेत. अलिकडेच जारी डीएनए परिणामांनी ही दोन्ही मुलं सख्खे भाऊबहिण होते याची पुष्टी केली आहे.
ऑपरेशन नायटिंगेल अंतर्गत करण्यात आलेल्या या उत्खननात सर्वात भावुक करणारी बाब म्हणजे मुलांना दफन करण्याची पद्धत होती. थडग्यात मोठ्या बहिणीला स्वत:च्या छोट्या भावाच्या दिशेने तेंड करून ठेवण्यात आले होते. ही स्थिती केवळ योगायोग नव्हता, तर त्यांच्यातील ‘जवळीक आणि देखभाली“च्या नात्याला दर्शविणारी होती असे पुरातत्वतज्ञांचे मानणे आहे. अँग्लो-सॅक्सन काळात अशाप्रकारचे दफन मिळणे अत्यंत दुर्लभ आहे. एकाचवेळी दोन मुलांना इतक्या प्रेम आणि काळजीपूर्वक दफन करण्यात आल्याचे पाहता त्या समुदायाच्या संवेदना स्पष्ट होतात.
तलवार अन् वर्कबॉक्सचे रहस्य
या शोधात केवळ सांगाडे नव्हे तर त्याच्यासाब्sात ठेवण्यात आलेल्या गोष्टीही खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत. छोट्या भावाच्या सांगाड्यानजीक एक प्राचीन तलवार मिळाली, तर मोठ्या बहिणीकडे एक ‘वर्कबॉक्स“ (शिवणकाम-विणकामाचा डबा) ठेवण्यात आला होता. अँग्लो-सॅक्सन समाजात या वस्तूंसोबत दफन करण्याचा प्रकार मुलांची सामाजिक प्रतिष्ठा किंवा परिवाराच्या स्थितीकडे इशारा करणारा आहे. तलवार शौर्य किंवा यौद्धावर्गाशी संबंधाचे प्रतीक असू शकते. तर वर्कबॉक्स घराच्या कामांमध्ये निपुणता किंवा जबाबदारी संकेत देतो.
विज्ञानाने उलगडले रहस्य
कोट्सवोल्ड पुरातत्वच्या प्रवक्त्यानुसार प्राचीन डीएनए विश्लेषणाने या रहस्याची उकल करण्यास मुख्य भूमिका पार पाडली आहे. वैज्ञानिक पुराव्यांशिवाय ते भाऊबहिण होते हे म्हणणे अवघड होते. परंतु मृत्यूनंतरही या कौटुंबिक बंधनाला तुटू दिले नाही हे आता स्पष्ट झाले आहे. त्यांच्या मृतदेहांची स्थिती पाहता त्यांना एकत्र दफन करण्यात आले होते हे स्पष्ट होते. सर्वसाधारणपणे थडग्यांमध्ये मृतदेह वेगवेगळे किंवा वेगवेगळ्या काळात दफन केले जातात. परंतु तेथे त्यांना समकालीन पद्धतीने एकत्र ठेवण्यात आले होते. हा शोध अँग्लो-सॅक्सन जीवन आणि त्यांच्या मान्यतांविषयी नवी माहिती प्रदान करतो.